शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेमुळे विकास कामे रखडली!

By admin | Updated: September 17, 2014 02:33 IST

मनपातील १४ कोटींच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांची मंजुरी.

अकोला : शहरात मूलभूत सुविधा व विकास कामांसाठी प्राप्त २६ कोटीच्या अनुदानाला ग्रहण लागल्याचे दिसत आहे. मागील दीड वर्षांंपासून मनपात पडून असलेल्या २६ कोटींपैकी १४ कोटींच्या प्रस्तावाला नुकतीच विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली असली तरी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुन्हा एकदा विकास कामे लांबणीवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. आचारसंहिता संपताच १९ ऑक्टोबरनंतर विकास कामांचा मार्ग मोकळा होणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. मनपा निवडणुकीच्या कालावधीत शहराची बकाल अवस्था लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी शहराचे पालकत्व स्वीकारले आणि मूलभूत सुविधा व विकास कामांसाठी २६ कोटींचे अनुदान वितरित केले. हा निधी मार्च २0१३ मध्ये मनपाला प्राप्त झाला; परंतु काँग्रेसप्रणीत आघाडीच्या अंतर्गत कलहामुळे या निधीचे नियोजन करण्यात पदाधिकार्‍यांसह प्रशासनाला अपयश आले. यात भरीस भर २६ कोटींच्या अनुदानात मॅचिंग फंड जमा करण्याची अट शासनाने नेमून दिल्याने ही अट रद्द करण्यासाठी सत्तापक्षाला जंगजंग पछाडावे लागले होते. उशिरा का होईना; परंतु सत्तापक्षासह वरिष्ठ अधिकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे मॅचिंग फंडची अट शासनाने रद्द केली. यावर पदाधिकार्‍यांनी विकास कामांचे प्रस्ताव तयार केले. मनपाच्या महासभेत २६ कोटींपैकी ११ कोटी ८५ लाख रुपये पाणी पुरवठा योजना हस्तांतरणासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकरिता राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावास १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी विभागीय आयुक्तांनी प्रस्तावाला मंजुरी दिली असली तरी नेमकी याच दिवशी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. यामुळे प्रशासनाला विकास कामांच्या निविदा काढणे आता शक्य नसल्यामुळे १९ ऑक्टोबरनंतर हा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.

** अन्यथा कामे झाली असती!

      विकास कामांसाठी १४ कोटींचा प्रस्ताव १८ जुलैच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला हो ता. यावर प्रशासनाने प्रस्तावाला विलंब केल्याने मंजुरीची पुढील प्रक्रिया रखडली. आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रस्तावाला मंजुरी मिळाली असती, तर विकास कामांचा मार्ग मोकळा झाला असता, हे तेवढेच खरे.