शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच औषध विक्री

By admin | Updated: September 1, 2014 21:41 IST

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ : औषध दुकानदारांना अन्न व औषध विभागामधील अधिकार्‍यांचे पाठबळ

अकोला : 'अँन्टी बायोटिक्स, आणि 'पेन किलर' औषधांमुळे मानवाच्या शरीरावर घातक परिणाम होत असून, मानवाची प्रतिकारशक्ती या औषधांमुळे कमी होत आहे. त्यामुळे घातक असलेल्या ४६ औषधांसाठी 'शेड्युल्ड एच १' तयार करून या औषधांची विक्री एमबीबीएस किंवा एमडी डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच करण्याचे आदेश आहेत; मात्र ग्रामिण भागातील औषधी दुकानदारांनी हे आदेश पायदळी तुडवित डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री सुरूकेली आहे. या औषध दुकानदारांवर कारवाई करण्यास कानाडोळा करण्यात येत असून, त्यांना अन्न व औषध प्रशासनातील अधिकार्‍यांचे पाठबळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.'अँन्टी बायोटिक्स' आणि 'पेन किलर' या औषधांची विक्री करण्यासाठी 'शेड्युल्ड एच १' तयार करण्यात आले आहे. या शेड्युल्डमध्ये अत्यंत धोकादायक आणि ज्या औषधांचा गैरवापर केला जाऊ शकतो, अशा ४६ औषधांची विक्री एमबीबीएस किंवा एमडी डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच करण्याचे आदेश राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. यासोबतच ही औषधं ज्या रुग्णांना दिली त्यांचे नाव, गाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, वय व ब्लड प्रेशरच्या माहितीचे रेकॉर्ड ठेवणे औषधी दुकानदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील औषधी दुकानदार चिठ्ठी नसतानाही या औषधांची विक्री करीत असून, या औषधी विनादेयकानेच खरेदी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. औषध दुकानदारांनी ही औषधं विक्री करताना डॉक्टरांची चिठ्ठी घेणे, औषधांचे देयक देणे, रुग्णाचे नाव पत्ता लिहून ठेवणे आवश्यक आहे. मात्र या औषधी विनादेयकाने घेण्यात येत असल्याने औषधी दुकानदारांना रेकॉर्ड ठेवण्याचा संबंधच राहिला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रतिकारशक्ती कमी करून ह्यलिव्हरह्ण निकामी करणार्‍या या औषधांची खुलेआम विक्री होत असताना अन्न व औषध प्रशासन विभागातील ग्रामीण भागाचे कामकाज पाहणारे अधिकारी व कर्मचारी मात्र मूग गिळून बसले आहेत. ** तपासणीच्या नावाखाली कारवाईचा देखावा ग्रामीण भागातील औषध दुकानांची तपासणी करण्यात येते, मात्र आजपर्यंत शेड्युल्ड एच-१ च्या पाहिजे त्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या तपासणीच्या नावाखाली कारवाईचा देखावा अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या औषधी विनादेयकाने खरेदी करून त्याची विक्रीही अशाच प्रकारे करण्यात येत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याकडेही अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे.