शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय उदासीनतेत अडकला दोन जिल्ह्यांचा ‘दुष्काळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 02:18 IST

अकोला, वाशिम जिल्ह्यांतील १७३५ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रतीक्षा.

संतोष येलकर/अकोला: राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्व १ हजार ४२0 गावांचा समावेश करण्यात आला; मात्र सुधारित व अंतिम पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असलेल्या अकोला व वाशिम या जिल्ह्यांतील १ हजार ७३५ गावांमध्ये अद्यापही दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली नाही. दोन्ही जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी सेना-भाजपचे प्राबल्य असतानाही, केवळ राजकीय उदासीनतेमुळे या गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश होऊ शकला नसल्याचे चित्र दिसत आहे.यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. खरीप पिकांची ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या राज्यातील १४ हजार ७0८ गावांमध्ये २0 ऑक्टोबर रोजीच्या शासननिर्णयानुसार दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नजरअंदाज पैसेवारीनुसार ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या अकोला जिल्ह्यातील ५५ गावांचा, तर वाशिम व बुलडाणा या दोन जिल्ह्यांतील एकाही गावाचा समावेश करण्यात आला नव्हता. नोव्हेंबरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या खरीप पिकांच्या सुधारित पैसेवारीनुसार अकोला, बुलडाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यांतील लागवडयोग्य सर्व गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी जाहीर करण्यात आली, तसेच अंतिम पैसेवारीदेखील ५0 पैशांपेक्षा कमी आहे. लागवडयोग्य सर्व गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने, तीनही जिल्ह्यांतील सर्व गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात शासनाच्या ९ नोव्हेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार बुलडाणा जिल्ह्यातील सर्व १ हजार ४२0 गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली; मात्र सुधारित व अंतिम पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असूनही दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत अकोला जिल्ह्यातील एकूण ९९७ पैकी केवळ ५५ गावे कायम ठेवण्यात आली, तर वाशिम जिल्ह्यातील एकूण ७९३ पैकी एकाही गावाचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. खरीप पिकांची ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सर्व १ हजार ४२0 गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली; मात्र पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असलेल्या अकोला जिल्ह्यातील ९४२ आणि वाशिम जिल्ह्यातील ७९३ गावे अद्यापही दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली नाहीत. सत्ताधारी आठ आमदार, मंत्री असूनही ह्यदुष्काळह्ण कायमच!अकोला जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे सहा, तर वाशिम जिल्ह्यात दोन आमदार आहेत. याशिवाय एक मंत्रीही अकोला जिल्ह्याला लाभला आहे. तरीही या दोन जिल्ह्यांतील सर्व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्यात या लोकप्रतिनिधींना यश आले नाही. सक्षम प्रतिनिधीत्वाचा दुष्काळच या दोन्ही जिल्ह्यांच्या नशिबी असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.तीन जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त गावे!जिल्हा                      एकूण गावे            दुष्काळग्रस्त गावेअकोला                            ९९७               ५५बुलडाणा                        १४२0               १४२0वाशिम                            ७९३                 00