शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

वळवाच्या पावसाने शेतकरी सुखावला!

By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST

मशागत, बियाणे खरेदीला तुरळक सुरुवात.

अकोला: वळवाच्या (मान्सूनपूर्व) पावसाने विदर्भातील शेतकरी सुखावला असून, काही शेतकर्‍यांनी मशागतीला सुरुवात केली, तर काहींनी अल्प प्रमाणात बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे.मागील आठ दिवसांपासून विदर्भात मान्सूनपूर्व पाऊस अधूनमधून कोसळत आहे; परंतु या पावसाला सार्वत्रिक स्वरू प नसल्याने ज्या भागात तो बरसला, त्या भागातील शेतकर्‍यांनी मशागतीला सुरुवात केली; परंतु बहुतांश शेतकर्‍यांच्या हाती पैसाच नसल्याने ते पीक विमा नुकसानभरपाईची प्रतीक्षा करीत आहेत.संपूर्ण विदर्भात खरीप हंगामाचे ५0 लाख हेक्टर क्षेत्र असून, पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) यात ३२ लाख हेक्टरचा समावेश आहे. पूर्व विदर्भात धान हे महत्त्वाचे पीक आहे, तर पश्‍चिम विदर्भात कापूस आणि सोयाबीन या पिकाची जवळपास २३ ते २४ लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. मागील चार ते पाच वर्षांंपासून पावसाची अनिश्‍चितता असल्याने उत्पादन व उत्पन्न घटल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांच्या हातात पैसाच नसल्याने मशागतीला यावर्षी वेळ होत आहे. गतवर्षी पडलेल्या दुष्काळाने शेतकर्‍यांच्या आर्थिक अडचणीत पुन्हा भर घातली आहे. परिणामी हातात पैसा नसल्याने बियाणे खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, १५ मेपासून सुरू होणार्‍या बियाणे खरेदीला अद्याप हवी तशी सुरुवात झाली नाही.दरम्यान, गत आठ दिवसांपासून विदर्भात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला असून, दुष्काळाने कडक झालेली शेतजमीन मऊ झाल्याने सधन शेतकर्‍यांनी काही ठिकाणी मशागतीला सुरुवात केली आहे.