शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमकांवरही ‘डीआरएम’ची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 16:12 IST

अकोला : रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर जशी भुसावळ येथे कारवाई झाली, तशीच कारवाई अकोल्यातही होऊ शकते. अकोल्यावर माझे लक्ष आहे, असा गर्भित इशारा भुसावळ डीआरएम आर. के. यादव यांनी दिला.

अकोला : रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर जशी भुसावळ येथे कारवाई झाली, तशीच कारवाई अकोल्यातही होऊ शकते. अकोल्यावर माझे लक्ष आहे, असा गर्भित इशारा भुसावळ डीआरएम आर. के. यादव यांनी दिला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा त्रिवार्षिक निरीक्षणासाठी शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी अकोला दौºयावर येत आहेत. त्यानिमित्ताने अकोला रेल्वेस्थानक आणि परिसराचा चेहरा-मोहरा बदलला जात असून, प्रत्यक्ष पाहणीसाठी डीआरएम शनिवारी अकोल्यात येऊन गेले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.प्रवाशांसाठी अकोला रेल्वेस्थानकावर पार्किंगची व्यवस्था सुसज्ज केली जात असून, ‘ड्रॉप अ‍ॅण्ड गो’ची सेवा सुरू होत आहे. ही सेवा व्हीआयपी आणि फोर-व्हीलरसाठी सुटसुटीत राहणार आहे. आॅटोरिक्षा चालकांना रेल्वे हद्दीत जागा दिली आहे, तेवढी पुरेशी आहे. इतर ठिकाणी ही जागा शहर हद्दीतून दिली जाते, असेही ते म्हणाले. यापुढे नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई होईल, असा इशाराही यादव यांनी दिला. भुसावळच्या धर्तीवर अकोल्यात कारवाई होईल काय, असा प्रश्न केला असता, त्यांनी संबंधित रेल्वे अधिकाºयांना तातडीने विचारणा केली. तारफैल, देशमुख फैल, नायगावपासून अनेक ठिकाणी अकोल्यात रेल्वे जागांवर अतिक्रमण केल्याची माहिती संबंधित अधिकाºयांनी डीआरएम यांना येथे दिली. या सर्वांना नोटीस पाठविल्याचेही त्यांनी सांगितले. अकोल्यातील अतिक्रमकांवर आपले लक्ष असल्याचे सांगून ते भुसावळकडे रवाना झालेत. डीआरएमसमवेत अधिकाºयांचा मोठा ताफा होता; मात्र स्थानिक रेल्वे समितीचे पदाधिकारी शनिवारी अनुपस्थित होते.पाच वर्षे तरी तुटणार नाही आरएमएस बिल्डिंग!रेल्वेस्थानक विस्तारात जुनी असलेली आरएमएस बिल्डिंग पाडल्या जाणार होती. पाडल्या जाणाºया बिल्डिंगची रंगरंगोटी सुरू असल्याने पत्रकारांनी त्यावर संशय व्यक्त केला. त्यावर अजून पाच वर्षे तरी आरएमएसची बिल्डिंग तुटणार नसल्याचे उत्तर दिले. मग प्लॅटफॉर्म विस्ताराचे काय ते होईल, असे त्यांनी सांगितले. रेल्वेस्थानकावरील आरएमएसची बिल्डिंग रेल्वेस्थानकात अडसर आहे. ई-मेल आणि सोशल मीडियाच्या जगात एवढ्या मोठ्या बिल्डिंगची आवश्यकता नाही, असे मत यावर झेआरयूसीसी सदस्य वसंत बाछुका यांनी व्यक्त केले.२१ डिसेंबरला महाव्यवस्थापक अकोल्यातत्रिवार्षिक निरीक्षणासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी अकोल्यात येत आहेत. या दौºयाच्या निमित्तानेच भुसावळ डीआरएमचे दौरे अकोल्यात वाढले आहेत. २१ डिसेंबरच्या आधी पुन्हा एकदा ते अकोल्यात येण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक