शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी चालक-वाहकांच्या कर्तव्य वाटपात होतोय कसूर!

By admin | Updated: April 8, 2017 01:37 IST

वाहतूक निरीक्षक करताहेत रोटेशन पद्धतीचा गैरवापर : कर्मचाऱ्यांची सामूहिक तक्रार

अकोला: वाहतूक निरीक्षक पी. के. इंगळे हे एसटी चालक -वाहकांच्या कर्तव्य वाटपात कसूर करीत असल्याची सामूहिक तक्रार, आगार क्रमांक २ मधील कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापक यांच्या माध्यमातून अकोला विभाग नियंत्रकांकडे केली आहे. कर्मचारी प्रचंड ताण-तणावात काम करीत असून, मर्जीतील लोकांना अभय देत इतर कर्मचाऱ्यांना हेतुपुरस्सर त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची विनंती लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अकोला आगार क्रमांक १ मध्ये ४0 बसेस, तर चालक १११ आहेत आणि आगार क्रमांक २ मध्ये ६५ बसेस, तर २१0 चालक आहेत. बस गाड्यांच्या तुलनेत चालकांची संख्या अधिक असल्याने, रोटेशन पद्धतीने चालकांना कर्तव्य वाटप अर्थात ड्युट्या अलॉट केल्या जातात; मात्र आगार क्रमांक २ चे वाहतूक निरीक्षक पी.के. इंगळे हे एसटी चालक-वाहकांच्या कर्तव्य वाटपात कसूर करीत असल्याची बाब विभाग नियंत्रकांना सादर करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. ड्युट्या अलॉट करताना ‘रोटेशन’च्या नावाखाली दुर्लक्षित चालक-वाहकांच्या रात्री मुक्कामी ड्युट्या लावल्या जातात, तर मर्जीतील चालक-वाहकांना दिवसपाळीत ड्युट्या अलॉट करून, त्याच्या ओव्हरटाइमची सोय लावली जाते. गैरहजर राहणाऱ्या दुर्लक्षित कर्मचाऱ्यांवर कारवाई, तर मर्जीतील कर्मचाऱ्यांची पाठराखण केली जाते. रजेसंदर्भातसुद्धा कर्मचाऱ्यांसोबत अशाच पद्धतीने दुजाभाव केला जात असल्याची तक्रार के. एम. सुरवाळे यांनी पुराव्यानिशी सादर केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वाहतूक निरीक्षक प्रशांत इंगळे यांनी आगारात ५00 रुपये प्रती माह लकी-ड्रॉ स्कीम सुरू केली असून, त्यात सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांवर ते दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे दुर्लक्षित चालक-वाहकांच्या महिन्याच्या पगारावर विपरीत परिणाम होत आहे. आर्थिक भुर्दंड आम्हीच का सहन करावा, याकरिता सातत्याने चालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वाद होतात. याचा परिणाम प्रचंड ताण-तणावात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर होत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. वाहतूक निरीक्षक पी.के. इंगळे यांच्या मनमानी कारभाराकडे कुणाचेच कसे लक्ष नाही, असा प्रश्न उपस्थित करून, या प्रकरणाची चौकशी करून वाहतूक निरीक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे विभाग नियंत्रकांकडे केली आहे. सामूहिक तक्रारीवर १०६ कर्मचाऱ्यांनी केल्या स्वाक्षरीएसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या वाहतूक निरीक्षक पी.के. इंगळे यांच्याविरुद्ध विभाग नियंत्रक यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर सर्व कर्मचारी संघटनांशी निगडित असलेल्या आगारातील १०६ कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी केल्या आहेत. स्वाक्षरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तक्रारीची प्रत मुंबई येथील एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातील उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह अकोल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी, सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनादेखील सादर केली आहे. कर्मचाऱ्यांची सामूहिक तक्रार प्राप्त झाली आहे. यासंदर्भात चौकशी केली जाईल. या प्रकरणात संबंधित अधिकारी दोषी आढळत असतील, तर निश्चितच त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.- रोहन पलंगे (विभाग नियंत्रक), एसटी महामंडळ, अकोला.