शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त वाहनचालकासाठी ‘कलेक्टर’ झाले ‘ड्रायव्हर’!

By admin | Updated: November 4, 2016 02:18 IST

सेवानिवृत्तीच्या दिवशी वाहनचालकाच्या कार्याचा केला गौरव.

अकोला, दि. ३- जिल्हाधिकार्‍यांच्या शासकीय वाहनाचे चालक म्हणून गत ३३ वर्षांपासून सेवा करणारे दिगंबर ठक गुरुवारी सेवानवृत्त झाले. त्यांच्या सेवानवृत्तीच्या दिवशी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ठक यांना वाहनामध्ये मागील बाजूस बसवून स्वत: वाहन चालवित त्यांच्या सेवाकार्याचा गौरव केला.जिल्हाधिकारी कार्यालयात वाहनचालक पदावर दिगंबर भगवान ठक गेल्या ३३ वर्षांपासून काम करीत होते. जिल्हाधिकार्‍यांना शासकीय निवास्थान ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचविणे तसेच जिल्हय़ातील विविध कामांसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या दौर्‍यात शासकीय वाहनाचे चालक म्हणून दिगंबर ठक काम करीत होते. ३३ वर्षांच्या सेवेनंतर गुरुवार, ३ नोव्हेंबर ते वाहनचालक पदाच्या सेवेतून नवृत्त झाले. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी दीपक बुलबुले आणि जिल्हाधिकार्‍यांचे वाहनचालक दिगंबर ठक यांच्या सेवानवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात निरोप सभारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमापूर्वी फुलांनी सजविलेल्या जिल्हाधिकार्‍यांच्या शासकीय वाहनांमध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी वाहनचालक दिगंबर ठक यांना वाहनाच्या मागील बाजूस बसविले आणि जिल्हाधिकारी शासकीय निवासस्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंंत जिल्हाधिकार्‍यांनी स्वत: वाहन चालवित ठक यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित निरोप सभारंभाच्या ठिकाणी आणले. वाहनचालकास वाहनाच्या मागच्या बाजूने बसवून जिल्हाधिकारी स्वत: वाहन चालवित असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी पाहीले. हे दृश्य पाहून सेवानवृत्त वाहनचालकासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत ह्यड्रायव्हरह्ण बनल्याचा प्रत्यय आला.प्रामाणिक काम करण्याचा दिला सल्ला!सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी दीपक बुलबुले आणि वाहनचालक दिगंबर ठग यांच्या सेवानवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी वाहनचालक ठग आणि सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी बुलबुले यांच्या कार्याचा गौरव केला. कोणतेही काम कमी नसते, असे सांगत प्रत्येक कर्मचारी माझा सहकारी असल्याचे ते म्हणाले. सेवेत काम करताना मी माझे काम किती प्रामाणिकपणे करतो, याबाबतचा विचार करणे गरजेचे आहे, असेही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपल्हिाधिकारी जी.डब्ल्यू. सुरंजे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.