शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सौभाग्याचं लेणं विकून केले डिजीटल स्कुलचे स्वप्न साकार

By admin | Updated: August 13, 2015 22:44 IST

लोकमत प्रेरणावाट ; विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षकाच्या पत्नीची तळमळ.

फहीम देशमुख /शेगाव (बुलडाणा): राज्यात डिजीटल स्कुल, ई-लर्निंग यासारखे आधुनिक प्रयोग शिक्षण क्षेत्रात सुरू असताना, या स्पर्धेत आपले विद्यार्थीही मागे पडू नयेत, या उद्देशाने डिजीटल क्लासरूम उभारण्यासाठी २/३ महिने लोकसहभाग चळवळ राबविली; मात्र तरीही हव्या त्या प्रमाणात यश मिळाले नाही. त्यामुळे हताश झालेल्या एका शिक्षकाचे नैराश्य त्याच्या पत्नीने स्वत:चे दागिने विकून दूर केले. शेगाव तालुक्यातील तरोडा कसबा जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाच्या पत्नीने समाजाला ही प्रेरणावाट दाखविली आहे. शेगाव तालुक्याअंतर्गत येणार्‍या तरोडा कसबा येथील जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक अध्यापक राजेश वासुदेव कोगदे यांची डिजीटल स्कुलच्या निर्मितीची तीव्र इच्छा होती; मात्र पुरेशा निधीअभावी त्यांची ही इच्छा केवळ स्वप्नवत होती. त्यांनी पत्नी सौ. छाया हिच्याजवळ इच्छा व्यक्त करून डिजीटल स्कुलअभावी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास रखडला असल्याची खंत व्यक्त केली. कोगदे यांच्या पत्नीला त्यांच्यातील विद्यार्थ्यांविषयीची तळमळ प्रकर्षाने दिसली. त्यांनी शाळेच्या डिजीटल क्लासरूमसाठी स्वत:चे दागिने विकून २४ हजार रूपयांची रक्कम उभी केली. या पैशातून शाळेसाठी एलईडी टीव्ही खरेदी केला जाणार असल्याचे कोगदे यांनी सांगितले. माझे पती शिक्षणाच्या माध्यमातून समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहेत, याचा मला अभिमान असून, तेच माझा खरा अलंकार आहेत, असे सौ. छाया कोगदे यांनी सांगितले. विद्यार्थीरूपी रत्नांना पैलु पाडण्याच्या त्यांच्या कामात योगदान देण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद आहे. लवकरच मान्यवरांच्या हस्ते डिजीटल क्लासरूमचे लोकार्पण केली जाईल. सर्वांच्या सहकार्याने शाळेतील प्रत्येक वर्ग डिजीटल करण्याचा प्रयत्न असून, यातून शैक्षणिक विकासाचे चक्र गतिमान होईल, असे मत राजेश कोगदे यांनी व्यक्त केले.