शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

उपमहापौर पदासाठी भाजपमध्ये रंगले नाट्य; प्रदेश नेतृत्वाची सूचना फेटाळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 14:23 IST

मनपात ताटकळत बसलेल्या आशिष पवित्रकार यांना अखेर अर्ज मागे घ्यावा लागल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापौर पदासाठी विजय अग्रवाल यांच्याच प्रभागातील सहकारी नगरसेविका अर्चना मसने यांची निवड केल्यानंतर उपमहापौर पदासाठी भाजपमध्ये दिवसभर राजकीय नाट्य रंगल्याचे चित्र होते. भाजपमध्ये दोन गटातील वाद सर्वश्रुत आहेत. अशावेळी उपमहापौर पदासाठी नगरसेवक आशिष पवित्रकार यांच्या उमेदवारीसाठी प्रदेश स्तरावरील नेतृत्वाने केलेली सूचना फेटाळून लावण्यात आल्याची माहिती आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत पक्षाकडून अनुमोदक-सूचक मिळेल, या प्रतीक्षेत मनपात ताटकळत बसलेल्या आशिष पवित्रकार यांना अखेर अर्ज मागे घ्यावा लागल्याचे समोर आले आहे.जिल्ह्याच्या राजकारणात भाजपमधील धोत्रे गटाचा वरचष्मा असल्याचे कोणीही नाकारत नाही. दुसऱ्या बाजूने डॉ. रणजित पाटील यांचा गट आहे. या दोन्ही गटातून विस्तवही जात नसल्याची परिस्थिती आहे. या दोन्ही गटातील एकमेकांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे अनेकांना चटके सहन करावे लागले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल नगरसेवक आशिष पवित्रकार यांना पक्षातून निलंबित करण्याची कारवाई महानगराध्यक्ष किशोर पाटील यांनी केली होती. या वादावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पडदा टाकला.दरम्यान, महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने अर्चना मसने व राजेंद्र गिरी यांची निवड केली. यावेळी उपमहापौर पदासाठी आशिष पवित्रकार यांना संधी देण्यात यावी, अशी सूचना प्रदेश स्तरावरील नेतृत्वाने केली. त्यामुळे पवित्रकार यांनी उपमहापौर पदाचे नामनिर्देशन पत्र तयार केले. यादरम्यान, भाजपमध्ये वेगवान घडामोडी झाल्या. पक्षाचे निर्देश लक्षात घेता दुपारी साडेतीनच्या सुमारास लोकप्रतिनिधींच्या घरी बैठकांचे सत्र पार पडले. तरीही सायंकाळी ६ वाजेपर्यंत नगरसेवक आशिष पवित्रकार यांना अनुमोदक-सूचक उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचे समोर आले. त्यानंतर पवित्रकार यांनी उमेदवारी अर्ज सादर न करणे पसंत केले.समन्वयकांची नियुक्ती का नाही?२०१७ मध्ये महापौर निवडीसाठी भाजपच्या प्रदेश स्तरावरून राज्यभरात समन्वयकांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी अकोला मनपाची जबाबदारी आ.डॉ. संजय कुटे यांच्याकडे होती. त्यावेळी डॉ. कुटे यांनी प्रत्येक नगरसेवकाचे मत विचारात घेतले होते. यावेळी पक्षाने राज्यात इतरत्र समन्वयकांची नियुक्ती केली असताना, केवळ अकोला मनपासाठी नियुक्ती न केल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका