शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वहिनीवर अत्याचार करणाऱ्या दिरास अटक

By admin | Updated: June 7, 2017 01:16 IST

अकोला: विधवा वहिनीला डांबून ठेवत तिच्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या दिरासह कुटुंबीयांविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विधवा वहिनीला डांबून ठेवत तिच्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या दिरासह कुटुंबीयांविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर दिरास मंगळवारी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीस गुरुवारपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पतीचा मृत्यू झाल्यानंतर दोन मुलांच्या संगोपनासाठी सासरी राहणाऱ्या विधवा महिलेवर तिचा दीर सुनील शर्मा याने शारीरिक अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास कुटुंबाची बदनामी होणार असल्याने सदर महिलेला डांबून ठेवत सासरच्यांनी तिचा छळ केला. यासोबतच तिच्यावर दिराने दोन वेळा अत्याचार केल्यानंतर विधवा वहिनीस खोलीत डांबून ठेवले. या अत्याचारामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या पीडित महिलेवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर तिने घडलेल्या अत्याचाराची आपबिती खदान पोलिसांना सांगितली. पोलिसांनी प्रकरण आपसात करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतरही महिलेने तक्रार दिल्यानंतर खदान पोलिसांनी नरेंद्र छगन शर्मा, शिलादेवी नरेंद्र शर्मा, मुकेश नरेंद्र शर्मा, संगीता मुकेश शर्मा, श्याम नरेंद्र शर्मा, नीशा श्याम शर्मा आणि सुनील नरेंद्र शर्मा यांच्याविरुद्ध महिलेचा पैशांसाठी छळ करणे, जबरदस्तीने शारीरिक शोषण करणे, घरात डांबून ठेवणे, जीवे मारण्याची धमकी देणे या प्रकारचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुनील शर्मा याने विधवा महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याने त्याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.