शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

डॉ. पंदेकृवि दीक्षांत समारंभ; २,२११ विद्यार्थी करणार पदवी ग्रहण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 18:31 IST

४४ विद्यार्थ्यांनी विविध विषयात प्रावीण्य प्राप्त केल्याने सुवर्ण पदकासह ७९ पदके प्रदान केली जाणार आहेत.

अकोला : यावर्षी ३०६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यापैकी २,२११ विद्यार्थी प्रत्यक्ष दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत पदवी ग्रहण करणार आहेत. यातील ४४ विद्यार्थ्यांनी विविध विषयात प्रावीण्य प्राप्त केल्याने सुवर्ण पदकासह ७९ पदके प्रदान केली जाणार आहेत. यावर्षी प्रथमच ५० नवे कृषी (पीएचडी) शास्त्रज्ञ देशाला मिळणार असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ उद्या बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष प्रा. आदित्य कुमार मिश्रा उपस्थित राहणार आहेत. दीक्षांत भाषण प्रा. मिश्रा करतील. यावर्षी गायत्री देवी या विद्यार्थिनीने बीएसी पदवी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त करीत ८ पदकांची मानकरी ठरली आहे. त्यातील ४ सुवर्ण पदके आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विद्यार्थी संजय येवले पाच सुवर्ण पदकांचा मानकरी ठरला आहे. यावर्षी प्रथमच ५० जणांनी आचार्य (पीएचडी) पदवी पूर्ण केली आहे. त्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान केली जाणार आहे.यावर्षी सर्वाधिक २०७५ बीएससी कृषी अभ्यासक्रमाचे उतीर्ण झाले असून, यामध्ये बीटेक अभियांत्रिकीचे १२५ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. तसेच उद्यान विद्या १५९, वनविद्या १९, जैवतंत्रज्ञान १०६, कृषी व्यवसाय व्यवस्थापन ७१, अन्नशास्त्र ८५ या विविध शाखांचा समावेश आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे ४२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये कृषी शाखा २७५ उद्यानविद्या ३१, वनविद्या १५, एमटेक (कृषी अभियांत्रिकी) २८, कृषी एमबीए ५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी ग्रहण करणाऱ्यांमध्ये १,४२८ मुले असून, ७८३ मुलींचा समावेश असल्याचे डॉ. भाले यांनी सांगितले.

 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोला