शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

२५४ कोटींच्या पाणीपुरवठा योजना ‘डीपीआर’ बदलणार !

By admin | Updated: September 14, 2016 02:16 IST

अकोला मनपाच्या हद्दवाढीमुळे समाविष्ट गावांचे सर्वेक्षण होणार.

आशिष गावंडे अकोला, दि. १३: अमृत योजनेंतर्गत संपूर्ण शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने २५४ कोटींचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला. आता मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे शहरालगतच्या २४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी डीपीआरमध्ये पुन्हा बदल केला जाणार असल्याची माहिती आहे. यासाठी २४ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा सर्व्हे केला जाईल.संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीत बदल करण्यासाठी शासनाने अमृत योजनेंतर्गत कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली आहे. महान धरण ते अकोला शहरापर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलणे, मोर्णा प्रकल्प ते महान धरणापर्यंत जलवाहिनी टाकणे, शहरातील मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलणे आदींसह विविध कामांचा समावेश आहे. योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम शासन स्तरावरून थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला देण्यात आले. मजीप्राने शहराची पाणीपुरवठा योजना गृहित धरून २५४ कोटी रुपये किमतीचा डीपीआर तयार केला. मुख्य अभियंता कार्यालयाने हिरवी झेंडी दिल्यानंतर सदर प्रकल्प अहवाल मजीप्राच्या मुंबईस्थित मध्यवर्ती कार्यालयात सादर करण्यात आला. यादरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी शासनाने मनपाच्या हद्दवाढीची अधिसूचना जारी केली. साहजिकच, मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावांमध्येदेखील अमृत योजनेतून पाणीपुरवठय़ाच्या वितरण प्रणालीत सुधारणा करावी लागणार आहे. त्यानुषंगाने मजीप्राने तयार केलेल्या डीपीआरमध्ये पुन्हा बदल केला जाणार असल्याची माहिती आहे. मनपासमोर वान धरणाचा पर्याय२0११ च्या जनगणनेनुसार शहरालगतच्या २४ गावांची लोकसंख्या १ लक्ष १२ हजार असून, यामध्ये मागील पाच वर्षांमध्ये किमान ४0 ते ५0 हजारांनी वाढ झाल्याचा अंदाज आहे. शहराच्या लोकसंख्येतही वाढ झाली आहे. ह्यअमृतह्ण योजनेंतर्गत नागरिकांना प्रत्येकी १३५ लीटर पाणीपुरवठा केला जाईल. २४ गावे आणि शहराची लोकसंख्या लक्षात घेतल्यास काटेपूर्णा (महान) प्रकल्पातील आरक्षित जलसाठा कमी पडण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी वान धरणाचा पर्याय समोर येऊ शकतो. २५ टक्के हिस्सा जमा करावा लागेलपाणीपुरवठा योजनेच्या एकूण कि मतीमध्ये २५ टक्के रकमेचा हिस्सा मनपा प्रशासनाला जमा करावा लागेल. ही रक्कम टप्प्याटप्प्यानुसार जमा केली जाणार असल्याने मनपाच्या तिजोरीवर बोजा पडणार नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे.मनपाकडून घेणार 'डाटा'मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावांतील पाणीपुरवठा योजनेची माहिती मनपाच्या जलप्रदाय विभागाने जमा केली आहे. ही संपूर्ण माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घेतली जाईल. त्यानंतर २४ गावांत सर्वेक्षण करून नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे.