शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ स्तर टेबल टेनिस स्पर्धेत एकता घाडगेला दुहेरी मुकुट

By admin | Updated: November 7, 2014 23:14 IST

कारंजा येथे रंगले विदर्भस्तरीय सामने, ३५0 खेळाडुंचा सहभाग.

अकोला: कारंजा येथे पार पडलेल्या विदर्भ चॅम्पियनशिपमध्ये अकोल्याच्या टेबल टेनिसपटूंनी उत्तम कामगिरी करीत भरघोस बक्षिसे मिळविली. महिला गटात एकता घाडगे हिने दुहेरी मुकुट पटकाविला. तीन दिवसीय या स्पर्धेत विदर्भातील ३५0 च्यावर खेळाडू सहभागी झाले होते. महिला विभागात अकोला जिल्हा संघाने विविध वयोगटात विजेतेपद पटकाविले. मुलांच्या गटातदेखील अकोल्याच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.मिडगेट गटात राज कोठारी याने यवतमाळच्या तन्मय बावणेचा पराभव करीत विजेतेपद मिळविले. कॅडेट गटात राघव नानोटे उपविजेता ठरला. युथ गटात अभिनव वाघाडेने उपान्त्यफेरी गाठली होती. पुरुष गटात अभिनव तिसर्‍या क्रमांकावर राहिला. महिला गटात एकता घाडगे हिने दुहेरी मुकुट पटकाविला. युथ गर्ल्स तथा महिला गटात एकता विजेती ठरली. एकताने युथ गर्ल्स गटात अकोल्याच्याच देवानी जेठवा हिचा पराभव केला. नेहा देशमुख व देवयानी व्यवहारे या दोघी युथ गर्ल्स गटात अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या स्थानावर राहिल्या. महिला गटात एकता घाडगे हिने आपली संघ सहकारी देवयानी व्यवहारे हिचा पराभव केला. नेहा देशमुख व देवानी जेठवा अनुक्रमे तीन व चार क्रमांकावर राहिल्या. मिडगेट मुली गटात गौरी कावळे हिने अकोल्याच्या श्रुती हातवळणे हिच्यावर अंतिम सामन्यात मात केली. कॅडेट गटात श्रुती हातवळणे हिने गौरी कावळेवर मात करीत पराभवाचा वचपा काढला.स्पर्धेचे उद्घाटन अकोला जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अँड. मोतीसिंह मोहता व राज्य टे-टे संघटनेचे कार्यकारी सभासद गणेश मंगरूळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आयोजकांच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंना जिल्हा टेबल-टेनिस असोसिएशनचे पदाधिकारी महेंद्र कोठारी, अमोद कुळकर्णी, दिलीप जोगी आदींचे मार्गदर्शन लाभले.