शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ला घाबरू नका; पण दक्षता हवी! - डॉ. राजकुमार चव्हाण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:03 IST

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद...

अकोला : चीनमधील वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभरात पसरला असून, हजारो लोक यापासून प्रभावित झाले आहेत. यावर अद्यापही औषध उपलब्ध नसल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील काही विद्यार्थी आणि व्यापारी गत काही दिवसांपूर्वी परतल्याने आपल्यालाही कोरोनाचा धोका तर नाही ना, अशी भीती अनेकांना सतावते आहे. या निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद...

कोरोना विषाणूमुळे होणारा आजार पसरतो कसा?कोरोना विषाणूमुळे होणारा आजार नेमका कसा पसरतो, याबाबत अजूनही निश्चित सांगता येत नाही; मात्र सर्वसाधारणपणे हा आजार हवेवाटे, शिंकण्यातून, खोकल्यातून बाहेर पडणाºया थेंबाद्वारे कोरोना विषाणू पसरतो. 

कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी? जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची लागण कोणालाच झालेली नाही; परंतु खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील उपाय करावे.श्वसनसंस्थेचे विकार असणाºया व्यक्तींनी संसर्गापासून सावध राहावे.हात वारंवार धुवावेशिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल धरावाअर्धवट शिजलेले किंवा कच्चे मांस खाऊ नयेफळे, भाज्या न धुता खाऊ नये

रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? कोरोना व्हायरसची लागण झाल्यास साधारणत: सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळून येतात. ही सामान्य लक्षणे असली, तरी श्वसनास त्रास होणाºया व्यक्तींनी हा त्रास कशामुळे होत आहे, हे स्पष्ट होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोरोना बाधित देशात प्रवास केलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

कोरोनाच्या रुग्णांसाठी आरोग्य यंत्रणेकडून काय तयारी?कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र आयसुलेट वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे. येथे रुग्णांची स्क्रिनिंग केली जाणार आहे. लक्षणे आढळताच रुग्णाचे नमुने नागपूरला पाठविण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमली आहे. तोपर्यंत रुग्णांना अ‍ॅन्टिबायोटीक औषधोपचार केला जाणार आहे. 

कोरोनाची लक्षणे काय?कोरोनाची लक्षणे मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडित असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे आदी लक्षणे दिसून येतात.

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या तरी जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पण सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाय योजनांची गरज आहे.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

टॅग्स :corona virusकोरोनाAkolaअकोलाinterviewमुलाखत