शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सेवाविनृत्त प्राध्यापकाचा मृतदेह मेडिकल कॉलेजला दान

By admin | Updated: April 20, 2015 01:48 IST

रमेश बंग यांचे आकस्मिक निधन

अकोला - एलआरटी महाविद्यालयातून सेवानवृत्त झालेले प्राध्यापक रमेश देवकिसन बंग यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दान देण्यात आला. त्यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. माहेश्‍वरी समाजातील प्रतिष्ठित नागरिक व सेवानवृत्त प्राध्यापक रमेश देवकिसन बंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७३ होते. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट अतुल बंग यांचे ते वडील होते. स्थानिक एलआरटी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी दिलेली सेवा आजही त्यांच्या विद्यार्थ्यांंना त्यांच्याबद्दल सन्मान ठेवून आहे. अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान करून आपले शरीर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांंच्या शिक्षणासाठी दान द्यावे, असे रीतसर पत्र वैद्यकीय महाविद्यालयाकडे दिले होते. डॉ. जुगल चिराणीया यांना नेत्रदानाची माहिती देताच त्यांच्या चमूने तातडीने येऊन नेत्रगोलक काढण्याचे काम पूर्ण केले. पारंपरिक पद्धतींना फाटा देऊन सरळ नेत्रदान करावे या त्यांच्या अंतिम इच्छेनुसार सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वैकुंठरथामध्ये त्यांचा मृतदेह ठेवून वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. आज सुटीचा दिवस असतानाही वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात आले. या कार्यात डॉ. महेश गांधी आणि डॉ. सदानंद भुसारी यांनी मोलाची साथ दिली. त्यांचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात देताना सर्वांंना गहिवरुन आले होते.