शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड तालुक्यात देशी दारूची द्वारपोच सेवा!

By admin | Updated: February 13, 2016 01:58 IST

पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपेत; महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल.

शीतल धांडे / रिसोड: पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिच्चून रिसोड शहरातून मोटारसायकलवर हजारो लीटर दारूची 'पार्सल' ग्रामीण भागात पोचविली जात आहे. विशेष म्हणजे शहरातील प्रत्येक चौकात पोलीस तैनात असतानाही हा गोरखधंदा सुरू असल्याने 'अर्थ'पूर्ण उलाढाल समोर येत आहे.शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्याच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत तालुक्यातील प्रत्येक गाव, वस्ती, तांड्यात द्वारपोच देशी दारूची 'पार्सल' दिल्या जात आहे. परिणामी प्रत्येक गावात मद्यपींना मागेल त्यावेळी सहज देशी-विदेशी दारू उपलब्ध होत आहे. यामुळे दिवसागणिक ग्रामीण भागातील क्राइमचा आलेखसुद्धा उंचावला असल्याचे दिसून येते. सहजरीत्या उपलब्ध होत असलेल्या दारूच्या आहारी युवक वर्ग मोठय़ा प्रमाणात गेल्याचे प्रामुख्याने दिसून येते. तर दिवसभर मोलमजुरी करून काबडकष्टाची तुटपुंजी कमाई अध्र्यापेक्षा अधिक दारू विक्रेत्याच्या घशात जात आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून, काही कुटुंबात कौटुंबिक कलहसुद्धा मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. सूर्योदयाच्या पहिल्या किरणोत्सवापासून शहरातील दारू विक्रेत्यांच्या दुकानातून २0 ते २0 वर्षे वयोगटातील युवक दिवसभर दारूच्या पेट्या दुचाकीवरून राजरोसपणे ग्रामीण भागात पोहचवून देतात. या मोबदल्यात त्यांना ठरावीक रक्कम दिली जाते. एका पेटीमागे ३५0 ते ४00 रुपये ठोक विक्री वगळता मार्जीन ठेवून ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रेत्याला दारूची पेटी रोख स्वरूपात दिल्या जाते, असे विश्‍वसनीय वृत्त आहे. दिवसभरातून अंदाजे शंभरच्या वर देशी दारू पेट्यांची विक्री केल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातून महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते.