शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वनशास्त्र पदवीधरांना हवे शंभर टक्के आरक्षण !

By admin | Updated: February 10, 2016 02:05 IST

इतर राज्यांमध्ये ५0 ते ७0 टक्के; राज्यात मात्र ५ टक्के.

अकोला: वनशास्त्र पदवीधरांसाठी इतर राज्यांमध्ये वनविभागाच्या नोकरीत ५0 टक्क्यांहून अधिक आरक्षण आहे; परंतु राज्यात केवळ पाच टक्केच आरक्षण देण्यात आले. त्यामुळे या पदवीधरांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. वनविभागातील विविध खात्यांमध्ये वनशास्त्र पदवीधरांना १00 टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत वनशास्त्राची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने भारतातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये वनशास्त्र पदवी अभ्यासक्रम सुरू केला. महाराष्ट्रातही अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात १९८५-८६ मध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. १९८८ च्या वनधोरणानुसार केंद्र सरकारने वनशास्त्र पदवीधरांना राज्याच्या वनविभागात सामावून घेण्याचे सूचित केले आहे तसेच २00६ मध्ये राष्ट्रीय वन आयोगाने दिलेल्या शिफारशीमध्ये राज्य सरकारांनी वनक्षेत्रपाल व सहायक वनसंरक्षक भरती, वनविद्या अभ्यासक्रम शिकविणार्‍या विद्यापीठांतील वनशास्त्र पदवीधरांमधूनच करावी, असे स्पष्टपणे सांगितले आहे. आतापर्यंत या दोन्ही विद्यापीठांमधून हजारो विद्यार्थी पदवीधर होऊन बाहेर पडलेत. या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात वनव्यवस्थापन, पर्यावरण रक्षण, वन्यजीवशास्त्र, वनसंरक्षण, वनकायदा यांसारखे विषय शिकविले जातात तसेच या विद्यार्थ्यांकडून सहा महिन्यांचे वनव्यावसायिक प्रशिक्षणही पूर्ण केले जाते. असे असतानाही त्यांना वनविभागात सामावून घेतले जात नाही. दरवर्षी या दोन्ही विद्यापीठांमधून ६४ विद्यार्थी पदवीधर होऊन बाहेर पडतात. वनविभागात दर तीन किंवा चार वर्षांनंतर पदभरती होते. त्यात वनशास्त्र पदवीधरांसाठी केवळ पाच टक्केच आरक्षण असल्यामुळे तीन किंवा चार पदवीधरच सेवेत सामावून घेतले जातात. त्यामुळे वनविभागातील विविध खात्यांमध्ये वनशास्त्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के आरक्षण देण्याची मागणी विद्यार्थी संघटनेने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.विविध राज्यांमध्ये वनशास्त्र पदवीधरांसाठी असलेले आरक्षणतामिळनाडू           ५0 टक्केहिमाचल प्रदेश       ७0 टक्केकेरळ                    २५ टक्केकर्नाटक                ७0 टक्केजम्मू-काश्मीर       ५0 टक्केओडिशा                ३0 टक्केगुजरात                 २५ टक्केमहाराष्ट्र                 0५ टक्केवनमंत्र्यांच्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे साखळी उपोषणआपल्या मागणीसाठी वनशास्त्र पदवीधरांनी १२ जानेवारीपासून वनमंत्र्यांचा गृहजिल्हा असलेल्या चंद्रपूर येथील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. यामध्ये २00 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.