शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST

अकोला : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याच्या पृष्ठभूमीवर आतापर्यंत कठोर असलेले निर्बंध सैल झाले असून, सर्वच व्यवहार सुरळीत ...

अकोला : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याच्या पृष्ठभूमीवर आतापर्यंत कठोर असलेले निर्बंध सैल झाले असून, सर्वच व्यवहार सुरळीत होत आहेत. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असताना रेल्वेची प्रवासी वाहतूक मात्र अजूनही पूर्ववत झालेली नाही. कोरोना संसर्गाच्या नावाखाली अजूनही विशेष गाड्या चालविण्यात येत असून, पॅसेंजर गाड्या बंदच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ पॅसेंजर गाड्यांमधूनच कोरोनाचा प्रसार होता का, असा सवाल आता सामान्य प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. राज्यात सध्या केवळ विशेष गाड्या धावत असून, या गाड्यांमध्ये केवळ आरक्षण केलेल्यांनाच प्रवास करता येतो. त्यामुळे आरक्षण न मिळालेल्यांची गोची होत आहे. शिवाय आरक्षण तिकीट महाग असल्याने सर्वसामान्यांच्या खिशालाही कात्री लागत आहे. अशा परिस्थितीत पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी जनसामान्यांमधून होत आहे.

सध्या सुरू असलेल्या फेस्टिव्हल स्पेशल गाड्या

कुर्ला-हावडा

ओखा-हावडा

पोरबंदर-हावडा

सध्या सुरू असलेल्या विशेष गाड्या

अमरावती-मुंबई

हावडा-अहमदाबाद

नागपूर-पुणे

कोल्हापूर-गोंदिया

नांदेड-श्रीगंगानगर

हापा-बिलासपूर

मग पॅसेंजर बंद का?

भुसावळ-नरखेड

वर्धा-भुसावळ

नागपूर-भुसावळ

अकोला-पूर्णा

अकोला-परळी

एक्स्प्रेसचा प्रवास परवडत नाही

आरक्षित डब्यांमध्ये प्रवासी प्रवास करू शकतात. या डब्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियम पाळले जातातच, हे छातीठोकपणे सांगता येत नाही. मग पॅसेंजर गाड्या का सुरू केल्या जात नाहीत. केवळ या गाड्यांमध्येच कोरोनाचा प्रसार होतो व विशेष गाड्यांमध्ये नाही, असाच अर्थ निघतो. सामान्यांचा विचार करून पॅसेंजर गाड्या सुरू केल्या पाहिजेत.

- मनीष निचळे, गांधीग्राम, जि. अकोला

एक्स्प्रेस व विशेष गाड्यांना छोट्या स्थानकांवर थांबे नाहीत. शिवाय दैनंदिन पास व इतर सवलतींचाही लाभ मिळत नाही. नजीकचा प्रवास करण्यासाठी पॅसेंजर गाड्या उपयुक्त होत्या. आता या गाड्या बंद असल्याने आमच्यासारख्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वेने पॅसेंजर गाड्या सुरू केल्या पाहिजेत.

- गजानन शेंडे, गोपालखेड, जि. अकोला