शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कागदोपत्री कामांच्या देयकांना मंजुरी नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 13:13 IST

अकोला: सहा वर्षांपूर्वी कागदोपत्री विकास कामे दाखवून मनपाच्या तिजोरीवर लाखो रुपयांचा डल्ला मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही कंत्राटदारांसह लेखा विभागातील भ्रष्ट प्रवृत्तींच्या ‘दलालां’चे मनसुबे ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी अशा देयकांना कदापि मंजुरी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अकोला: सहा वर्षांपूर्वी कागदोपत्री विकास कामे दाखवून मनपाच्या तिजोरीवर लाखो रुपयांचा डल्ला मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही कंत्राटदारांसह लेखा विभागातील भ्रष्ट प्रवृत्तींच्या ‘दलालां’चे मनसुबे ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी अशा देयकांना कदापि मंजुरी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एवढ्यावरच न थांबता गुरुवारी आयुक्त कापडणीस यांनी लेखा विभागातील कामकाजाची झाडाझडती घेतली. त्यावेळी प्रभारी मुख्य लेखा परीक्षक जे. एस. मानमोठे, लेखाधिकारी मनजित गोरेगावकर यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केल्याची माहिती आहे.महापालिकेचे तत्कालीन प्रभारी आयुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांच्या कार्यकाळात काही नगरसेविका, नगरसेवक पुत्रांनी बांधकाम विभागातील भ्रष्ट प्रवृत्तीच्या अभियंत्यांना हाताशी धरून कागदोपत्री विकास कामे पूर्ण केली. तत्कालीन मुख्य लेखा परीक्षक गो. रा. बैनवाड यांच्या काळात महापालिकेच्या तिजोरीची अक्षरश: लूट करण्यात आली. काही कंत्राटदारांनी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून कागदोपत्री विकास कामे केल्याची बाब तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अशा देयकांना बाजूला सारले. तत्कालीन आयुक्त अजय लहाने, जितेंद्र वाघ यांच्या कालावधीत कागदोपत्री कामे करणाºया कंत्राटदारांनी भूमिगत होणे पसंत केले. यादरम्यान, संजय कापडणीस यांना आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारून उणापुरा दोन महिन्यांचा कालावधी होत नाही तोच लेखा विभागातील काही ‘दलालां’नी व एकाच ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून ठिय्या मांडून बसलेल्या या विभागातील कर्मचाºयांनी थकीत देयक प्राप्त व्हावे, या उद्देशातून सहा वर्षांपूर्वीच्या फायलींचा प्रवास सुरू केला. ही बाब मनपाने चव्हाट्यावर आणताच या प्रकरणाची आयुक्त संजय कापडणीस यांनी गंभीर दखल घेतली.देयकांना मंजुरी नाही; चौकशी होणार!२०१३ मध्ये काही नगरसेविका व नगरसेवक पुत्रांनी प्रभागातील विकास कामांचा कागदोपत्री अनुशेष दूर केला. अशा देयकांना कदापि मंजुरी देणार नसल्याची भूमिका आयुक्त संजय कापडणीस यांनी स्पष्ट केली आहे, तसेच संबंधित देयकांच्या फायली व त्यावरील विकास कामांची चौकशी केली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिल्याने अनेकांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका