शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचे सत्कार्य - संचेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2016 02:39 IST

महाआरोग्य शिबिराचा समारोप, पालकमंत्र्यांनी केला ज्येष्ठ शल्यचिकित्सकांचा सन्मान.

अकोला: महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून पश्‍चिम विदर्भातील गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या विविध आजारांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले. शासकीय डॉक्टरांसोबतच शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी शिबिरात सेवा देऊन एक प्रकारचे सत्कार्य केले आहे. कार्याचा कधीही सन्मान होत नाही; सन्मान हा नेहमी सत्कार्याचा होतो. या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने सत्कार्य घडले आहे, असे प्रतिपादन मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांनी येथे केले. महाआरोग्य रोगनिदान व उपचार शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे सीईओ एम. देवेंदर सिंह, आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. किशोर मालोकार, डॉ. अशोक ओळंबे, दीपक मायी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत डवंगे, डॉ. आर. एन. भांबुरकर, डॉ. आरती कुलवाल, डॉ. नरेश बजाज आदींची उपस्थिती होती. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वी झाले. शहरातील खासगी रुग्णालयांमधील डॉक्टरांनी दोन दिवस त्यांचे दवाखाने, रुग्णालये बंद ठेवून पूर्णवेळ येथे सेवा दिली. भविष्यात सुद्धा त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये शहरातील ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉ. नानासाहेब चौधरी, डॉ. आर.एन. भांबुरकर, डॉ. एन. के. माहेश्‍वरी, डॉ. आर.बी. हेडा, डॉ. कराळे यांचा शाल व श्रीफळ देऊन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यासोबतच डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. डवंगे, प्रकाश सावल, संदीप पुंडकर, प्रभजितसिंह बछेर, संत निरंकारी सेवादल यांसह शिबिरामध्ये योगदान देणार्‍या सामाजिक, धार्मिक संस्था पदाधिकार्‍यांचा पालकमंत्र्यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. हर्षवर्धन मालोकार यांनी केले.