शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

त्रुटींची पूर्तता करण्यासाठी डॉक्टरांची लगबग!

By admin | Updated: June 6, 2017 00:24 IST

१०४ दवाखान्यांमध्ये आढळल्या होत्या त्रुटी : ‘सीएस’ कार्यालयात कागदपत्रे सादर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आरोग्य विभागाच्यावतीने १५ मार्च ते १९ मे २०१७ या कालावधीत राबविण्यात आलेल्या रुग्णालयांच्या धडक तपासणी मोहिमेंतर्गत विविध नियमांचे उल्लंघन व त्रुटी आढळून आलेल्या जिल्ह्यातील १०४ डॉक्टरांनी आता त्रुटींची पूर्तता करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. आतापर्यंत अनेक डॉक्टरांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात त्रुटींची पूर्तता करणारी कागदपत्रे सादर केली असून, ही प्रक्रिया आणखी काही दिवस चालणार आहे.राज्य शासनाच्या आदेशानुसार, जिल्ह्यात १५ मार्च ते १९ मे २०१७ या काळात जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वातील पथकांनी रुग्णालय तपासणीची धडक मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत शहर व ग्रामीण भागात एकूण १३४ रुग्णालये, दवाखान्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १०४ रुग्णालये, दवाखान्यांमध्ये विविध नियमांचे उल्लंघन होत असल्याचे तसेच विविध त्रुटी आढळून आल्या. यामध्ये बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट, अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची पदवी नसतानाही त्या पॅथीची प्रॅक्टिस करणे, बायोमेडिकल वेस्ट अ‍ॅक्ट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसणे, रुग्णांचे केस पेपर नसणे अशा विविध त्रुटी आढळून आल्या. याबाबतचा एकत्रित अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या चमूने गत महिन्यात २० मे रोजी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत सादर केला. त्यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी त्रुटी सादर करा, अन्यथा कारवाईस सामोरे जाण्यास सिद्ध राहा, असा कठोर इशाराच डॉक्टरांना दिला होता.तेव्हापासून त्रुटी आढळलेल्या डॉक्टरांनी त्रुटींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही डॉक्टरांनी त्यांच्याकडे आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करणारी कागदपत्रे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या कार्यालयात सादर केली आहेत. १० तारखेला निर्णयविविध त्रुटी व नियमांचे उल्लंघन आढळलेल्या डॉक्टरांकडून त्रुटींची पूर्तता करण्यात येत आहे. यासाठी त्यांना काही दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. सर्व १०४ डॉक्टरांकडून कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर शनिवार, १० जून रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत डॉक्टरांच्या भवितव्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.डॉक्टरांकडून त्रुटींची पूर्तता करणारी कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १० तारखेला जिल्हास्तरीय समितीची बैठक होणार असून, त्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. - डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.