शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवर उपचार करणारा डॉक्टर!

By admin | Updated: August 28, 2016 23:26 IST

मलकापूर येथील युवकाचा स्त्युत्य उपक्रम; शेतक-यांना मिळतोय आधार.

मनोज पाटील मलकापूर(जि. बुलडाणा),दि. २८: मानव व गुरांच्या आजारांवर उपचार करणारे विविध प्रकारचे दवाखाने सर्वत्र अस्तित्वात आहेत; परंतु शेतीचा दवाखानाही असू शकतो ही स्वप्नवत कल्पना बुलडाणा जिल्हय़ातील मलकापूर शहरात साकारल्या जात आहे. येथील शेती तज्ज्ञ गणेश विठ्ठल पाटील हे कमी खर्चात शेतीपासून भरघोस उत्पादन शेतकर्‍यांना कसे मिळवून देता येईल, या दृष्टीने झटत असून त्यांचे हे कार्य आजच्या घडीला निश्‍चितच वाखाणण्याजोगे ठरत आहे.गणेश पाटील यांचे मूळ गाव दाताळा असून त्यांचे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगपर्यंंंत झालेले आहे. शिक्षणानंतर पुणे येथे ९ वर्ष वीज वितरण कंपनीत नोकरी, त्यानंतर शेतीविषयक वस्तू विक्रीचा व्यवसाय, विद्युत वाहिन्या उभारणीची कामे, उपसा जलसिंचनाची कामे करीत असताना शे तकरी बांधवांशी त्यांचा सातत्याने संपर्क जुळत राहिला. दरम्यान, शेती व्यवसाय परवडत नाही, शेती व्यवसाय म्हणजे जीवघेणा व्यवसाय अशी नकारार्थी भावना त्यांना नेहमीच कानावर पडत होती. या प्रकाराने ते उद्विग्न होत होते. त्यानंतर सन १९९६ ला ते इस्राइल देशात कृषी प्रदर्शनाला गेले. तेथे त्यांनी शेतातील नवनवीन बदल व बदलत्या काळानुरूप शेतीचे प्रयोग प्रत्यक्ष पाहिले. दरम्यानच्या काळात त्यांनी मूळ गावी दाताळा येथे येऊ न १५ एकर शेतीला आता कसायचे हा चंग मनी बांधला. प्रथम वर्षीच त्यातील ३ एकरमध्ये ५0 हजार रुपये खर्च करून केळीचे पीक घेतले. केळीच्या उत्पादनातून ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. सदर उत्पन्न म्हणजेच त्या शेतीची खरेदी किंमतच.शेतकर्‍यांना आधार२0११ पासून मलकापूर शहरातील बुलडाणा रोडवर शेतकर्‍यातील हरवलेली उमेद जागे करण्याकरिता शेतीचा दवाखान सुरू केला. येथे खनिज द्रव्य, घ्युमिक अँसिड, फल्विक अँसिड, समुद्र वनस्पती अर्क, संजीवके, केवोलीन, विद्राव्य करण्यासाठी रसायने शेतकर्‍यांना पिकाच्या पानांची तपासणी करुन उ पलब्ध करून दिली जातात. तसेच शेती संदर्भातील मार्गदर्शन व सल्लासुद्धा दिला जातो.