शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण तपासणी न केल्याच्या कारणावरून डॉक्टरला मारहाण

By admin | Updated: July 8, 2017 02:17 IST

अकोला : मुजफ्फर नगरमधील नातेवाइकाला तपासले नाही म्हणून एका डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. डॉक्टरच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुजफ्फर नगरमधील नातेवाइकाला तपासले नाही म्हणून एका डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. डॉक्टरच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मुजफ्फर नगरातील रहिवासी डॉ. सय्यद फैज रहेमन सय्यद दाऊद हाशमी (५३) यांचा येथे दवाखाना आहे. या दवाखान्यात परिसरातील रुग्ण त्यांच्याकडे तपासणीसाठी येतात. याच परिसरात राहणारा इम्रान कुरेशी, रिजवान कुरेशी, इरफान कुरेशी हे त्यांच्याकडे नेहमी तपासणीसाठी येतात. रुग्णास व्यवस्थित तपासले नाही, लवकर तपासा या ना त्या कारणावरून सदर तिघे जण डॉक्टरशी वाद घालत. त्यांच्याकडून हा प्रकार दोन ते तीन वेळा झाला; मात्र डॉक्टरने दुर्लक्ष केले. त्यानंतर शुक्रवारी या तिघांनी नातेवाइकाची प्रकृती ठीक नव्हती म्हणून गुरुवारी रात्री त्यांच्याकडे धाव घेतली. डॉक्टरांनी लवकर दरवाजा उघडला नाही म्हणून त्यांच्यावर या तिघांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर काही वेळात डॉ. सय्यद फैज रहेमन हे दुचाकी क्र. एमएच ३० - ९६८६ ने बाहेर जाण्यासाठी निघाले असता त्यांना इम्रान कुरेशी, रिजवान कुरेशी, इरफान कुरेशी, सोहेल कुरेशी, रफिक कुरेशी या पाच जणांनी डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी त्यांनी रामदासपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी सदर आरोपींविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम २०१० नुसार गुन्हा दाखल केला आहे.