संतोष येलकर / अकोला: जनसुविधा योजनेंतर्गत कामांसाठी गत चार वर्षांत शासनाकडून प्राप्त निधीपैकी अखर्चित निधीचा हिशेब जिल्ह्यातील अकोला, बाश्रीटाकळी, मूर्तिजापूर व तेल्हारा या चार पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्यांकडून (बीडीओ) अद्यापही जिल्हा परिषदकडे सादर करण्यात आला नाही. वारंवार निर्देश देऊनही अखर्चित निधीचा हिशेब सादर करण्याकडे कानाडोळा करणार्या चारही 'बीडीओं'ना जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांनी (डीसीईओ) मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमींच्या विकासकामांसाठी सन २0१0 ते २0१४ या चार वर्षांच्या कालावधीत शासनामार्फत प्राप्त निधी जिल्हा परिषदमार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात आला. स्मशानभूमी विकासाची कामे करण्याकरिता पंचायत समित्यांकडून जिल्ह्यातील लहान व मोठय़ा ग्रामपंचायतींना निधी वितरित करण्यात आला. या निधीतून झालेली कामे, कामांवर खर्च झालेला निधी व अखर्चित असलेला निधी, याबाबतची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत वारंवार जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्यांकडून मागविण्यात आली; मात्र माहिती प्राप्त झाली नसल्याने, यासंबंधीची माहिती जिल्हा परिषदेला शासनाकडे सादर करता आली नाही. जनसुविधा योजनेंतर्गत शासनाकडून प्राप्त निधी आणि त्यामधून झालेला खर्च व अखर्चित राहिलेल्या निधीसंबंधी ७ नोव्हेंबरपर्यंंत जिल्ह्यातील आकोट, बाळापूर व पातूर या तीन पंचायत समित्यांच्या ह्यबीडीओंह्ण कडून जिल्हा परिषदेकडे माहिती प्राप्त झाली; मात्र अकोला, बाश्रीटाकळी, मूर्तिजापूर व तेल्हारा या चार पंचायत समित्यांच्या ह्यबीडीओंह्णकडून अद्यापही माहिती सादर करण्यात आली नाही. वारंवार सूचना देऊनही माहिती सादर करण्यास टाळाटाळ करणार्या या चारही पंचायत समित्यांच्या 'बीडीओं'ना मंगळवार, १0 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम.कुळकर्णी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तातडीने खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
अखर्चित निधीचा हिशेब देण्याकडे कानाडोळा
By admin | Updated: November 13, 2015 02:06 IST