शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांकडून कर्जवसुली सक्तीने करु नका!

By admin | Updated: December 29, 2014 01:57 IST

अकोला जिल्ह्यातील बँक अधिका-यांना निर्देश.

संतोष येलकर /अकोलाशेतीशी निगडित कर्जाची शेतकर्‍यांकडून सक्तीने वसुली करू नये, असे निर्देश जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील बँक अधिकार्‍यांना दिले.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक हातून गेले तसेच दुबार-तिबार पेरणी करूनही सोयाबीन उगवले नाही. उगवलेल्या सोयाबीन पिकाचे उत्पादन एकरी ५0 किलो ते एक क्विंटलच्यावर झाले नाही. कपाशीचे उत्पादनही बुडाले असून, पावसाअभावी जमिनीतील ओल खोल गेल्याने रब्बी पिकांचेही खरे नाही. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. नापिकीच्या स्थितीत जिल्ह्यातील ९९७ गावांमध्ये खरीप पिकांची सुधारित पैसेवारी सरासरी ४१ पैसे असल्याचे जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गत १५ नोव्हेंबर रोजी जाहीर केले तसेच ५0 पैशांपेक्षा पैसेवारी कमी असल्याने, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगितीसह विविध सवलती लागू करण्यात आल्या. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँक व व्यापारी बँकांच्या अधिकार्‍यांची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. टंचाई परिस्थितीत शेतीशी निगडित शेतकर्‍यांना वाटप करण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाची काटेकोर अंमबजावणी करून,शेतकर्‍यांकडून सक्तीने कर्ज वसुली करू नये, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी बँकांच्या अधिकार्‍यांना दिले. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक टी. डी. गायकवाड यांच्यासह विविध ३५ बँकांचे अधिकारी उपस्थित होते. टंचाई परिस्थितीत शेतकर्‍यांकडील कर्ज वसुलीस शासन निर्णयानुसार स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करून, शेतकर्‍यांकडून कर्जवसुलीसाठी सक्ती करण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्ह्यातील बँकांना देण्यात आले. याशिवाय शेतकर्‍यांना वाटप करण्यात आलेल्या कर्जाचे रूपांतरण करून, कर्ज वाटप करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वाटप करण्यात आलेले कर्ज!हंगाम                शेतकरी                   रक्कमखरीप                १,११,४३३            ७0७ कोटी ३८ लाखरब्बी                       ४४७                  ४ कोटी 0३ लाख....................................एकूण               १,११,८८0              ७११ कोटी ४१ लाख