शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वायुसेनेच्या यशाचे राजकारण नको -  अबू आझमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 13:36 IST

लष्करी कारवाई व पुलवामा हल्ल्यांच्या संदर्भात झालेल्या घडामोडींवर शंका-प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांसमोर पुरावे सादर करून त्यांची तोंडे बंद करावी, सत्य समोर आणावे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत केली.

अकोला: पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला व त्यानंतर वायुसेनेने मिळविलेल्या यशाचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घेऊ नये, या यशाचे राजकारणही करू नये, असे आवाहन करतानाच लष्करी कारवाई व पुलवामा हल्ल्यांच्या संदर्भात झालेल्या घडामोडींवर शंका-प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांसमोर पुरावे सादर करून त्यांची तोंडे बंद करावी, सत्य समोर आणावे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत केली.अकोल्यातील जाफरी पार्क मैदानावर आयोजित सभेला संबोधित करण्यासाठी आ. अबू आझमी शुक्रवारी अकोल्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला. ते म्हणाले, की पुलवामा येथील घटना व लष्कराने केलेली यशस्वी कारवाई याचे सत्ताधारी पक्षाकडून होत असलेले राजकारण दुर्दैवी आहे. वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राइकचा अभिमानच आहे; मात्र या कारवाईत जे दहशतवादी मारल्या गेल्याचे सांगण्यात येते, त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत असल्याने सत्य समोर येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. वायुसेनेच्या कारवाईचे श्रेय कोणी घेऊ नये, युद्ध हा उपाय नसून, दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. त्यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष सै. मोहिन, प्रदेश उपाध्यक्ष अफझल फारुख, परवेज सिद्धिकी, महिला आघाडी प्रमुख माया चवरे यांच्यासह सपाचे पदाधिकारी बादशाह सेठ, सैयद अली व महेमूद खान उपस्थित होते. समविचारी पक्षांसोबत, अन्यथा स्वबळावर लढणार!भाजपच्या पराभवासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे आवश्यक असून, यासाठी काँग्रेसने सहकार्य करावे, असा सल्ला त्यांनी दिला. मतांचे विभाजन टाळण्यासाठी हे आवश्यक आहे. अ‍ॅड. आंबेडकर यांची कार्यशैली माहीत असल्याने त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीत सहभागी होणार नाही, असे स्पष्ट करतानाच काँग्रेस आघाडीने जागा न सोडल्यास स्वबळावर ४८ जागांवर लढणार, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणAbu Azmiअबू आझमी