शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या मालमत्तांवर दुपटीपेक्षा अधिक कर नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:34 IST

अकोला: महापालिका प्रशासनाने अकोलेकरांच्या  मालमत्ता करात २८ ते ३0 टक्के दरवाढ केली. ही करवाढ  अमान्य असल्याचे सांगत शिवसेना आमदार गोपीकिशन  बाजोरिया यांनी जुन्या मालमत्तांवर दुप्पटपेक्षा अधिक कर  नकोच,अशी आग्रही भूमिका घेतली. पालकमंत्री डॉ.  रणजित पाटील यांनी बुधवारी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात  आयोजित केलेल्या बैठकीत करवाढीच्या मुद्यावर सविस्तर  चर्चा पार पडली. यावेळी शासकीय जागेवरील दुकानांसह  मनपाच्या संकुलांमधील व्यावसायिकांना लागू केलेली  भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ठळक मुद्देआ. बाजोरियांची आग्रही भूमिकापालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिका प्रशासनाने अकोलेकरांच्या  मालमत्ता करात २८ ते ३0 टक्के दरवाढ केली. ही करवाढ  अमान्य असल्याचे सांगत शिवसेना आमदार गोपीकिशन  बाजोरिया यांनी जुन्या मालमत्तांवर दुप्पटपेक्षा अधिक कर  नकोच,अशी आग्रही भूमिका घेतली. पालकमंत्री डॉ.  रणजित पाटील यांनी बुधवारी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात  आयोजित केलेल्या बैठकीत करवाढीच्या मुद्यावर सविस्तर  चर्चा पार पडली. यावेळी शासकीय जागेवरील दुकानांसह  मनपाच्या संकुलांमधील व्यावसायिकांना लागू केलेली  भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेने प्रत्येक चार वर्षांनंतर मालमत्तांचे  पुनर्मूल्यांकन करून दोन टक्के दराने सुधारित कर प्रणाली  लागू करणे अपेक्षित असताना मालमत्ता करांत अव्वाच्या  सव्वा दरवाढ करण्याच्या मुद्यावर शिवसेना आ. गोपीकिशन  बाजोरिया यांनी आक्षेप घेतला आहे. मनपा क्षेत्रात  शासनाच्या जागेवर उभारलेल्या तसेच मनपाच्या  मालकीच्या व्यावसायिक संकुलातील दुकान  व्यावसायिकांना दहा ते पंधरा पट अधिक दराची भाडेवाढ  केल्याचा मुद्दा आ. बाजोरिया यांनी विधिमंडळात उपस्थित  केला होता. यावर तोडगा काढण्यासाठी  लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी  तसेच मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक आयोजित  करण्याचे आश्‍वासन नगर विकास राज्यमंत्री तथा  पालकमंत्री डॉ. पाटील यांनी दिले होते. त्यानुषंगाने  पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांच्या दालनात बैठक आयोजित केली. बैठकीत जुन्या  मालमत्तांवर दुप्पटपेक्षा अधिक कर अमान्य असल्याची  भूमिका आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी लावून धरली.  बैठकीला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महा पालिका आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके,  कर अधीक्षक विजय पारतवार आदी उपस्थित होते. 

दुकानदारांना दिलासा!मनपाच्या अधिनस्त असलेल्या जागेवर वार्षिक भाडे पट्टय़ावर व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना ‘ पीडब्ल्यूडी’च्या धर्तीवर भाडे  आकारण्यात आले. ही  भाडेवाढ मोठय़ा प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे  ती रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

मनपाला नियमानुसार दुप्पटपेक्षा अधिक दराने कर लागू  करता येत नाही. यासंदर्भात शासनाचे निर्देश आहेत. नवीन  ३१ हजार मालमत्ता वगळल्यास जुन्या मालमत्तांना दुप्पट पेक्षा अधिक कर लागू करण्याची गरज नाही. मनपाने ठोस  निर्णय घ्यावा; अन्यथा हायकोर्टात दाखल करण्यासाठी  याचिका तयार आहे.-गोपीकिशन बाजोरिया, आमदार

आम्ही इमारतीच्या चटई क्षेत्रफळानुसार मोजमाप करून  कर लागू केला. पूर्वीच्या ‘सेल्फ असेसमेंट’मुळे बर्‍याच  तफावती आहेत. अशा इमारतींची कर तपासणी करून तो  गरज असेल तर कमी करण्यात येईल. -अजय लहाने, आयुक्त मनपा