शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या कामात हलगर्जी करू नका!

By admin | Updated: July 13, 2017 01:03 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना निर्देश : पात्र शेतकऱ्यांची माहिती शनिवारपर्यंत सादर करा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीच्या कामात शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे सांगत कर्जमाफीच्या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती शनिवार, १५ जुलैपर्यंत सादर करण्याचा ‘अल्टिमेटम’देखील जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे विभागीय मुख्य अधिकारी श्रीकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड उपस्थित होते. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्यातील कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. कर्जमाफी योजनेसंदर्भात शासन निर्णयातील निकषांप्रमाणे बँकांनी वेळेत कार्यवाही करणे आवश्यक आहे. यासंबंधी अडचणी असल्यास मांडाव्यात; मात्र कर्जमाफीच्या कामात हलगर्जीपणा करू नये आणि जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची अद्ययावत माहिती १५ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. या बैठकीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी उपस्थित होते.पीक कर्ज वाटपात दिरंगाई केल्यास कारवाई! यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ लाख १४ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे; परंतु अद्याप जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक कर्जाच्या लाभापासून वंचित असल्याच्या मुद्यावर नाराजी व्यक्त करीत उद्दिष्टाप्रमाणे ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिले. पीक कर्ज वाटपाच्या कामात दिरंगाई केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी यावेळी दिला.पीक विम्याचा शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करा!पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी विमा कंपन्या व बँकांनी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या कामासाठी कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठ्यांची मदत घेण्याचे सांगत पीक विमा योजनेंतर्गत कामाचा दर आठवड्यात आढावा घेतला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.