शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

एकही पात्र शेतकरी कर्जमाफीतून सुटू नये!

By admin | Updated: July 8, 2017 02:22 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना निर्देश: थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती तातडीने सादर करा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शानानाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी सुटता कामा नये, असे निर्देश देत कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी सायंकाळी बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे. या योजनेत पात्र थकबाकीदार शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीस पात्र ठरणार आहेत. या पृष्ठभूमीवर कर्जमाफी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी सुटणार नाही, याबाबत दक्षता घेऊन पात्र थकबाकीदार सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले, तसेच कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती तातडीने गोळा करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत बँकांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे, रिझर्व्ह बँकेचे एलडीओ राजशेखरन, नाबर्डचे राजेंद्र वाळके यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी उपस्थित होते.पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास होऊ नये!यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सांगत पीक कर्जासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत बँकांनी खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले.१२ जुलै रोजी घेणार आढावा!कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील बँकांच्या कामाचा आढावा आणि पीक कर्ज वाटपाच्या कामाचा आढावा १२ जुलै रोजी आयोजित बैठकीत घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले.