शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही महाराजांकडे जाऊन मोक्षप्राप्ती होत नाही - श्याम मानव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:39 IST

कोणत्याही महाराज, बाबांकडे सिद्धी किंवा चमत्कार करण्याचे सार्मथ्य नाही. ते केवळ धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली समाजाची फसगतच करीत आहेत. सर्वच बाबा, महाराज भोंदू असून, ते स्त्रीलंपट आहेत. आतापर्यंत अनेक महाराजांनी स्त्री, युवती, मुलींचे शोषण केले आहे. कोणत्याही महाराज, बाबाच्या नादी लागून आणि त्यांच्या सान्निध्यातून मोक्षप्राप्ती होणार नाही. त्यामुळे समाजातील महिलांनी अशा भोंदू साधू, बाबांपासून सावध राहिले पाहिजे, अशा परखड शब्दात अंनिसंचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी आवाहन केले. 

ठळक मुद्देव्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद आयएमए, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोणत्याही महाराज, बाबांकडे सिद्धी किंवा चमत्कार करण्याचे सार्मथ्य नाही. ते केवळ धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली समाजाची फसगतच करीत आहेत. सर्वच बाबा, महाराज भोंदू असून, ते स्त्रीलंपट आहेत. आतापर्यंत अनेक महाराजांनी स्त्री, युवती, मुलींचे शोषण केले आहे. कोणत्याही महाराज, बाबाच्या नादी लागून आणि त्यांच्या सान्निध्यातून मोक्षप्राप्ती होणार नाही. त्यामुळे समाजातील महिलांनी अशा भोंदू साधू, बाबांपासून सावध राहिले पाहिजे, अशा परखड शब्दात अंनिसंचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी आवाहन केले. आयएमए व महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्यावतीने  सोमवारी आयएमए सभागृहात आयोजित ‘वृक्ष तेथे छाया.. बुवा तेथे बाया’ या व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आयएमएचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे होते. बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे, प्रदेश सरचिटणीस अँड. सुधाकर खुमकर, आयएमएचे सचिव डॉ. रणजित देशमुख, डॉ. हर्षवर्धन मालोकार हे मंचावर उपस्थित होते. प्रा. श्याम मानव म्हणाले, ‘वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया’ हे वाक्य पूर्णत: खरे आहे. कोणताही बाबा बायकांच्या भानगडीशिवाय नाही. देशभरात अनेक बाबा, महाराज आहेत आणि ते सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांच्या डोळय़ांदेखत धर्म, श्रद्धेच्या नावाखाली समाजाची फसवणूक करीत आहेत. महिला वर्ग तर अक्षरश: बाबांच्या किती आहारी गेला आहे, याची उदाहरणे देत प्रा. श्याम मानव यांनी, अनेक महाराजांच्या चमत्कारांचा, त्यांच्या फसवेगिरीच्या, रासलीलांच्या कथाच श्रोत्यांसमोर मांडल्या. त्यांनी मीही अनेक बाबांचा भक्त होतो.प्रत्येक बाबामध्ये काहीतरी दैवीशक्ती असते, असा समज होता. पुढे बाबांच्या रासलीलांनी परिचित झालो. केडगावकर बाबा हा स्वत:ला राजयोगी समजत असे आणि तो स्त्रियांकडून र्मदन करून घेत असे. विद्यानंद नावाच्या एका बाबाला तर स्त्रियांचे प्रचंड आकर्षण असे. असे सांगत प्रा. मानव यांनी अनेक महाराजांचा नावानिशी उल्लेख करीत त्यांनी केलेले चमत्कार व त्यांच्या रासलीलांच्या कथाही प्रात्यक्षिकांसह श्रोत्यांना ऐकविल्या. हे भोंदू बाबा, महाराज समाजातील श्रद्धेचा फायदा घेऊन मोक्ष, दैव, सिद्धी आणि धर्माचा वापर करून आपणच सिद्धपुरूष असल्याचे भासवतात आणि आपले शब्द प्रमाण, पुरावा आहेत. हे समाजाला सांगतात आणि समाजातील सुशिक्षित, विज्ञानवादी लोक त्यांच्या भुलथापांना बळी पडतात. असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे पुरुषोत्तम आवारे यांनी केले.-