शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा शेतकर्‍यांवर भरवसा नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 20:24 IST

प्रारंभीपासूनच कुठल्या ना कुठल्या कारणावरून रखडलेली  शासकीय तूर खरेदी पुन्हा पंचनाम्यासाठी रखडली असून, शे तकर्‍यांच्या घरी तूर आहे का, हे खात्री करूनच खरेदी होणार  असल्याने ‘सोनू तुझा माया..’ या गाण्याच्या कडव्यावर  सरकारचा शेतकर्‍यांवर भरवसा नाही का? असा प्रश्न उपस्थित  होत आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांच्या घरी जाऊन होत आहेत पंचनामेशासकीय तूर खरेदी पुन्हा पंचनाम्यासाठी रखडली  शेतकर्‍यांच्या घरी तूर आहे का, हे खात्री करूनच खरेदी होणार 

 

चंद्रशेखर ठाकरे * पिंजर  प्रारंभीपासूनच कुठल्या ना कुठल्या कारणावरून रखडलेली  शासकीय तूर खरेदी पुन्हा पंचनाम्यासाठी रखडली असून, शे तकर्‍यांच्या घरी तूर आहे का, हे खात्री करूनच खरेदी होणार  असल्याने ‘सोनू तुझा माया..’ या गाण्याच्या कडव्यावर  सरकारचा शेतकर्‍यांवर भरवसा नाही का? असा प्रश्न उपस्थित  होत आहे.प्रारंभीपासूनच तूर खरेदीमध्ये व्यापार्‍यांचेच ‘चांगभले’  झाल्याची सर्वत्र चर्चा असून, अनेक ठिकाणी तूर खरेदीत  मोठय़ा प्रमाणात घोटाळे झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे  ‘ब्रेक’नंतर आता पुन्हा सुरू केलेल्या तूर खरेदीत पारदर्शकता  आणण्याचे शासनाकडून निर्देश असल्याचे प्रशासन सांगत  असून, त्या धर्तीवर कृ षी विभाग, महसूल विभागासह अनेकांवर  शेतकर्‍यांच्या घरी जाऊन तुरीचा पंचनामा करण्याचे निर्देश  जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याची माहिती आहे.२४ जुलै रोजी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी कृ षी  विभागाला पंचनामे करायचे पत्र दिले. त्यानुसार बाश्रीटाकळी कृ  षी विभागाच्या कृ षी सहायकांनी पंचनामे सुरू केले असून,  यामुळे शेतकर्‍यांच्या विश्‍वासार्हतेवर सरकार प्रश्नचिन्ह निर्माण  करीत असल्याच्या भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.  दुसरीकडे साध्याभोळय़ा शेतकर्‍यांचा फायदा घेत ‘टोकन’  मिळविणार्‍या व्यापार्‍यांची मात्र झोप उडाल्याचे चित्र सर्वत्र  दिसून येत आहे. दरम्यान, बाश्रीटाकळी तूर खरेदी केंद्रावर ७  फेब्रुवारी २0१७ पासून तर ७ जून २0१७ पर्यंत सुमारे ६४ हजार  ६१६ क्विंटल खरेदी झाली असून, ४३ हजार ९२0 क्विंटल खरेदी  बाकी असल्याचे समजते. त्यामध्ये २६ जूनपासून २ जुलैपर्यंत ३  हजार २१५ क्विंटलची खरेदी केली आहे.

*जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २५ जून रोजी मिळालेल्या  यादीनुसार कृ षी सहायक तुरीचे पंचनामे करीत असून, आतापर्यं त २६ शेतकर्‍यांच्या घरी जाऊन पंचनामे केले. पुन्हा सुमारे ७00  शेतकर्‍यांची यादी आम्हास प्राप्त झाली आहे. तेसुद्धा त्वरित  पंचनामे करून अहवाल सादर करू.- सुरेश अवनाते,तालुका कृ षी अधिकारी, बाश्रीटाकळी.