शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

 फ्लॅट खरेदीवेळी जीएसटी आकारू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:18 IST

नगर विकास विभागाने संबंधित बिल्डरकडे बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असेल तर खरेदीदाराकडून जीएसटी न आकारण्याची सूचना ३० मार्च रोजी जारी केली आहे.

अकोला: सदनिका, कमर्शियल कॉम्प्लेक्स, घर किंवा दुकानांची खरेदी करताना खरेदीदाराकडून वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारण्याच्या मुद्यावर बांधकाम व्यावसायिकांकडून दिशाभूल केली जात असल्याचे प्रकार होत आहेत. या प्रकाराची दखल घेत नगर विकास विभागाने संबंधित बिल्डरकडे बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असेल तर खरेदीदाराकडून जीएसटी न आकारण्याची सूचना ३० मार्च रोजी जारी केली आहे.डिसेंबर २०१५ पर्यंत राज्यातील अनधिकृ त बांधकामे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. अशा अनधिकृत बांधकामासाठी शासनाने हार्डशिप अ‍ॅन्ड कम्पाऊंडिंगची नियमावली लागू केली. या नियमावली अंतर्गत इमारतीचा अनधिकृत भाग नियमित करण्यासाठी आकारल्या जाणारे शुल्क प्रचंड असल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी प्रस्ताव सादर करताना हात आखडता घेतला. ही बाब लक्षात घेता शासनाने हार्डशिपचे दर (शुल्क) ठरविण्याचा अधिकार स्वायत्त संस्थांना देण्याचा निर्णय घेतला; परंतु यासंदर्भातील अधिसूचना जारी न केल्यामुळे हा प्रस्ताव अधांतरी सापडला. यादरम्यान, केंद्र शासनाने देशभरात जीएसटी लागू केला. यामध्ये सदनिका, तयार घरे, कमर्शियल कॉम्प्लेक्स तसेच दुकानांची विक्री करताना बांधकाम व्यावसायिकांनी जीएसटीची आकारणी केली. यामुळे ग्राहकांवर बोजा पडत असल्याचे लक्षात येताच शासनाने संबंधित बिल्डरकडे बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असेल तर खरेदीदाराकडून जीएसटी न आकारण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही खरेदीदारांकडून जीएसटी वसूल केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.निर्माणाधीन प्रकल्पांना जीएसटी लागूनिर्माणाधीन गृहप्रकल्प, इमारती, घरांचे बांधकाम अर्धवट आहे, अशा प्रकल्पांची विक्री होत असेल तर संबंधित खरेदीदाराला जीएसटी जमा करणे क्रमप्राप्त आहे. जीएसटीची सुधारित नियमावली तयार झाल्यानंतर दर कमी झाले आहेत. त्यामुळे बिल्डरांनी फ्लॅट, इमारत किंवा घरांच्या किमती वाढवणे अपेक्षित नसून, कमीत कमी कराचा बोजा ग्राहकांवर टाक ण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.शासनाच्या सूचनेनंंतरही जीएसटी लागू केला जात असेल, तर संबंधित ग्राहकांनी जीएसटी कार्यालयाकडे तक्रारी कराव्यात. त्याची निश्चित दखल घेतली जाईल.-डॉ. अनिल करडेकर, जीएसटी कर आयुक्त, अकोला विभाग

 

टॅग्स :AkolaअकोलाGSTजीएसटी