शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

दुचाकीवरील मालवाहतुकीला लगाम लागेना!

By admin | Updated: June 20, 2015 02:27 IST

दुचाकींवरून वाहतूक करणा-या राज्यात दहा हजार दुचाकींची नोंद.

खामगाव : लहान कुटुंबांची शान की सवारी म्हणून प्रचलित असलेल्या दुचाकीवरून आता सर्रास मालवाहतूक केली जाते. याकडे प्रादेशिक परिवहन विभागाने कानाडोळा केल्याने विविध खाद्यपदार्थांसह सिलिंडर आणि मिनरल वॉटरचे जार पोहचविण्यासाठीही दुचाकींचा वापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे अरुंद गल्ली-बोळीतून मालवाहू वाहने जात नसल्याने खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍यांसह दैनंदिन गरजेच्या वस्तू विकणार्‍यांनी दुचाकीवरून मालवाहतुकीसाठी विशेष संरचना करून घेतली आहे. दूध विक्रेत्यांच्या कॅन वाहतुकीची शक्कल पाहून मिनरल वॉटर जारचा पुरवठा करणार्‍यांनीही वाहतूक खर्चात बचत करण्यासाठी दुचाकीवरूनच कॅनचा पुरवठा करणे सुरू केले आहे. दरम्यान, दुचाकीवरून मालवाहतुकीसंदर्भात राज्य शासनाचे ऑक्टोबर २0१0 चे परिपत्रक अस्तित्वात येण्यापूर्वी केंद्रीय मोटार वाहन कायदा ६६ आणि १९२ अ नुसार अशा वाहनांवर कारवाई केली जात होती. आता कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने राज्य शासनाचा महसूल बुडत आहे.

*दुचाकींवरील मालवाहतूक

     ऑक्टोबर २0१0 ते सन २0१३ पर्यंत दुचाकींवरून वाहतूक करणार्‍या (ट्रान्सपोर्ट) मुंबईसह राज्यात दहा हजार दुचाकींची नोंद करण्यात आली आहे. हा आकडा गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढला असून, खात्रीलायक सूत्रांनुसार मालवाहतूक करणार्‍या दुचाकींचा आकडा तीस हजाराच्याही वर असल्याची माहिती आहे.

*नियम पायदळी!

 दुचाकीवरून मालवाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्र शासनाच्या आदेशानंतर राज्य शासनाने परिपत्रक काढून मालवाहतूक करणार्‍या दुचाकींना ट्रान्सपोर्ट परवाना देण्याची तरतूद केली आहे. त्याचप्रमाचे अशा दुचाकी चालविणार्‍यांना ट्रान्सपोर्ट वाहतूक परवानादेखील दिला जातो; मात्र राज्यातील सर्वच ठिकाणी नॉन ट्रान्सपोर्ट परवान्यावरच दुचाकीवरून मालवाहतूक होत असून, याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने गेल्या काही वर्षांत राज्यात दुचाकींवरून मालवाहतूक वाढीस लागली आहे.