शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा संपेपर्यंत विद्यार्थ्यांची अडवणूक करू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 03:33 IST

आमदार बाजोरियांची पोलीस प्रशासनाला सूचना

अकोला, दि. ८- इयत्ता दहावी आणि बारावीचा पेपर सोडवण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांंना शहर वाहतूक पोलिसांकडून दुचाकी चालविण्याचा परवाना तसेच इतर कागदपत्रांची मागणी केली जात आहे. हा प्रकार ऐन पेपरच्या दिवशी होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांंसह त्यांचे पालक कमालीचे वैतागले आहेत. त्यामुळे इयत्ता दहावी आणि बारावीचे पेपर संपेपर्यंंत विद्यार्थ्यांंची अडवणूक न करण्याची सूचना शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, शहर वाहतूक शाखाप्रमुख प्रमोद काळे यांना केली. इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांंची बोर्डाची परीक्षा सुरु आहे. चांगल्या टक्केवारीत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करतात. विद्यार्थ्यांंसोबतच पालकांचीही धांदल उडाल्याचे पहावयास मिळते. अशावेळी ऐन सकाळी-सकाळी पेपर सोडवण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांंची वाहने अडवून त्यांच्याकडून दुचाकी चालवण्याचा परवाना तसेच वाहनांच्या कागदपत्रांची मागणी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून होत आहे. या प्रक्रियेला १५ ते २0 मिनिटांचा अवधी लागत असल्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचताना विद्यार्थी जीवाचे रान करतात. यादरम्यान दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराला वैतागलेल्या असंख्य पालकांनी शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे बुधवारी धाव घेतली. पोलिसांच्या कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे पेपर सोडवण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांंच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे किमान परीक्षा होईपर्यंंत पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांंकडून वाहन चालविण्याचा परवाना किंवा इतर कागदपत्रांची तपासणी न करण्याची मागणी त्यांनी आ. बाजोरियांकडे लावून धरली. परीक्षेचा काळ व विद्यार्थ्यांंची मानसिकता लक्षात घेता परीक्षा संपेपर्यंंंत विद्यार्थ्यांंची अडवणूक न करण्याची सूचना आ. बाजोरिया यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, शहर वाहतूक शाखाप्रमुख प्रमोद काळे यांना केली.पोलीस प्रशासनाने दिला होकार!आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांंंचे पेपर संपेपर्यंंंत त्यांच्या वाहनांची तपासणी न करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याची माहिती आहे. पोलिसांच्या सकारात्मक भूमिकेमुळे विद्यार्थ्यांंंनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. काही पालकांनी तक्रारी केल्यानंतर विद्यार्थ्यांंंची वाहने तपासली जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले. या प्रकाराची दखल घेऊन परीक्षा संपेपर्यंंंत विद्यार्थ्यांंंच्या वाहन तपासणीला शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला.-प्रमोद काळे, शहर वाहतूक शाखाप्रमुख