शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी आली; पण गरिबांना मिळाली नाही डाळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 18:21 IST

- संतोष येलकर अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात ...

- संतोष येलकर

अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात हरभरा डाळ व उडीद डाळ वितरीत करण्यासाठी, मागणीप्रमाणे डाळींचा साठा अद्याप जिल्हयातील गोदामांमध्ये उपलब्ध झाला नाही. त्यामुळे दिवाळी आली असली तरी, जिल्ह्यातील गरिब शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरातील हरभरा व उडीद डाळ मिळाली नाही. अशीच परिस्थिती राज्यातील इतरही जिल्ह्यात असल्याने, शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरातील डाळींचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.केंद्र शासनाने खरेदी केलेल्या हरभरा व उडीदाची भरडई करुन, प्राप्त होणारी हरभरा डाळ व उडीद डाळ राज्यातील लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील कुटुंब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना स्वस्त दराने वितरीत करण्याचा निर्णय गत १७ आॅक्टोबर २०१८ रोजी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत घेण्यात आला. त्यानुसार शिधापत्रिकाधारकांना ३५ रुपये प्रती किलो दराने हरभरा डाळ आणि ४४ रुपये प्रति किलो दराने उडीद डाळ वितरीत करण्यासाठी राज्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांमार्फत डाळ साठयांची मागणी (नियतन ) शासनाकडे करण्यात आली. दिवाळीचा सण आला असला तरी, अकोल्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये हरभरा डाळ आणि उडीद डाळीचा साठा गोदामांमध्ये उपलब्ध झाला नसल्याने, ५ नोव्हेंबरपर्यंत रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरातील डाळींचे वितरण सुरु करण्यात आले नाही. दिवाळी आली असली तरी, गरिबांना स्वस्त दरातील हरभरा डाळ व उडीद डाळ मिळाली नसल्याने, शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरातील डाळींचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.२ लाख ४१ हजार लाभार्थ्यांसाठी केवळ २०० क्विंटल डाळ उपलब्ध !अकोला जिल्ह्यात प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत २ लाख ४१ हजार ९५९ शिधापत्रिकाधारक लाभार्थी असून, या शिधापत्रिकाधारकांना हरभरा डाळ व उडीद वितरीत करण्यासाठी ४ हजार ८४० क्विंटल डाळ साठ्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली. त्या तुलनेत ५ नोव्हेंबरपर्यंत केवळ २०० क्विंटल हरभरा डाळीचा साठा अकोल्यातील गोदामात उपलब्ध झाला.

४८४० क्विंटल डाळीची मागणी !अकोला जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांसाठी स्वस्त दरात हरभरा डाळ आणि उडीद डाळ वितरीत करण्यासाठी २ हजार ४२० क्विंटल हरभरा डाळ आणि २ हजार ४२० क्विंटल उडीद डाळ अशा एकूण ४ हजार ८४० क्विंटल डाळ साठ्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली.

 

टॅग्स :Akolaअकोला