शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची भूमिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:09 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्‍यांनी ऑनलाइन  भरलेल्या अर्जांची छाननी तातडीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू  असून, दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा,  अशी आमची भूमिका असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा  शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी बुधवारी येथे दिली.

ठळक मुद्देदिवाकर रावते यांची माहिती अर्जांची छाननी पूर्ण करण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्‍यांनी ऑनलाइन  भरलेल्या अर्जांची छाननी तातडीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू  असून, दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा,  अशी आमची भूमिका असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा  शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी बुधवारी येथे दिली.कर्जमाफी योजनेचा आढावा घेण्यासाठी  दिवाकर रावते  अकोल्यात आले असता, पत्रकारांशी ते बोलत होते. मंगळवारी  झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विदर्भात कमी झालेला  पाऊस, त्यामुळे पाण्याची कमतरता आणि कर्जमाफीच्या मुद्यावर  चर्चा करण्यात आली. त्यामध्ये दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना  कर्जमाफीचा लाभ देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले, असे रावते म्हणाले. कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी  ऑनलाइन भरलेल्या अर्जांची छाननी तातडीने पूर्ण करण्यासाठी  प्रयत्न सुरू असून, ग्रामपंचायत निवडणुका नसलेल्या गावांमध्ये  चावडी वाचनाद्वारे कर्जमाफीच्या अर्जांच्या छाननीचे काम पूर्ण  झाले असून, ग्रामपंचायत निवडणुका असलेल्या गावांमधील  कर्जमाफीच्या अर्जांचे चावडी वाचन रखडले आहे; मात्र  कर्जमाफी अर्जांच्या चावडी वाचनासाठी ग्रामपंचायत  निवडणुकीच्या आचारसंहितेची अडचण नसावी, त्यामुळे  यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात  आल्याचे ते म्हणाले.कर्जमाफीसाठी पात्र ठरणारे शेतकरी इत्यादी  मुद्यांचा आढावा घेण्यासाठी विदर्भातील ११ जिल्हय़ांचा दौरा  अकोल्यापासून सुरू केल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेनेचे सहायक संपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर, माजी  आमदार संजय गावंडे, अँड. अनिल काळे उपस्थित होते.

किमान एका शेतकर्‍याचा सात-बारा कोरा झाला पाहिजे!कर्जमाफी योजनेत किमान एक शेतकर्‍याचा सात-बारा कोरा  झाला पाहिजे, असा शिवसेनेचा आग्रह असल्याचे दिवाकर राव ते यांनी सांगितले. एका शेतकरी कुटुंबात पतीकडे एक लाख रु पये आणि पत्नीकडे ८0 हजार रुपये कर्ज आहे, अशा शेतकरी  कुटुंबाला दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ दिला  पाहिजे, असे उदाहरणही रावते यांनी यावेळी दिले.