शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे निर्देश असतानाही दिव्यांग परिचारिकांना कामातून सूट नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 10:34 IST

राज्य शासनाने २ मे रोजी परिपत्रक काढत दिव्यांग परिचारिकांना कामातून सूट देण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत अकोला जिल्ह्यात शेकडो दिव्यांग, कर्मचारी, अधिकारी, आरोग्यसेवक, परिचारिका सेवा देत आहेत.त्यांना सेवा देताना, घरून कामाच्या ठिकाणी जाताना, येताना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे राज्य शासनाने २ मे रोजी परिपत्रक काढत दिव्यांग परिचारिकांना कामातून सूट देण्याचे निर्देश दिले आहेत; परंतु सर्वोपचार रुग्णालय व इतर रुग्णालयांमधील परिचारिकांना जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने सूट दिली नाही. संघटनेने सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्य दिव्यांग अधिकारी, कर्मचारी संघटना दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.कोरोनाच्या संकटकाळात दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, आरोग्यसेवक, परिचारिका, अधिपरिचारिका सेवा देत आहेत. त्यांना घरून येताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्रास होतो. त्यामुळे राज्य शासनाने निर्णय घेत, २ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, अधिपरिचारिकांना कामातून सूट देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्वोपचार रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांनी अधिष्ठाता यांच्याकडे अर्ज केला; परंतु अधिष्ठाता यांनी त्यांचा अर्ज नाकारला. शासनाचे स्पष्ट निर्देश असतानासुद्धा आरोग्य यंत्रणेतील अधिकारी कामातून सूट द्यायला तयार नाहीत. यंत्रणेकडून शासनाच्याच नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे त्यांची दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे राज्य दिव्यांग अधिकारी, कर्मचारी संघटनेच्यावतीने तक्रारकरण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संजय बरडे, सचिव मोहम्मद अ. अजीज, अविनाश वडतकर, जावेद इकबाल व सुधीर कडू यांनी सांगितले.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या