शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

अर्थमंत्र्यांच्या बैठकीत मिळणार जिल्हानिहाय कृती आराखड्यांना मंजुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 13:44 IST

अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९-२० यावर्षीच्या कृती आराखड्यांना मान्यता देण्यासाठी २१ जानेवारी रोजी अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे

संतोष येलकर,अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९-२० यावर्षीच्या कृती आराखड्यांना मान्यता देण्यासाठी २१ जानेवारी रोजी अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत अमरावती विभागातील जिल्हानिहाय जिल्हा वार्षिक योजनेच्या कृती आराखड्यांना मंजुरी देण्यात येणार आहे.अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांतील जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षातील विकास कामांच्या कृती आराखड्यांना मान्यता देण्यासाठी अमरावती येथे विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या बैठकीला पाचही जिल्ह्यांचे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा नियोजन समित्यांकडून मंजुरी देण्यात आलेल्या पाचही जिल्ह्यांतील जिल्हा वार्षिक योजनेच्या कृती आराखड्यांना या बैठकीत मंजुरी देण्यात येणार आहे.जिल्हानिहाय कृती आराखडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू!जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विकास कामांच्या कृती आराखड्यांना विभागीय बैठकीत अर्थमंत्र्यांकडून मंजुरी देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांचे कृती आराखडे तयार करणे आणि या कृती आराखड्यांना जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत मंजुरी घेण्याची प्रक्रिया पाचही जिल्ह्यांत सुरू करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी देण्यात आल्यानंतर जिल्हानिहाय कृती आराखड्यांना विभागीय बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे.अतिरिक्त निधीची होणार मागणी!शासनाच्या निकषानुसार जिल्हा नियोजन समित्यांकडून मंजूर करण्यात आलेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या कृती आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या निधीव्यतिरिक्त विविध यंत्रणांच्या मागणीनुसार विकास कामांसाठी पाचही जिल्ह्यांत अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अर्थमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार