शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:14 IST

बाळापूर : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. २७ सरपंच पदापैकी तीन सरपंच अविरोध निवडून आले, तर २0५ सदस्यांपैकी ७५ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. तालुक्यात १३0 जागांसाठी ३0८ उमेदवार तर सरपंच पदाच्या २४ जागांसाठी ९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शनिवारी २४ हजार १0१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

ठळक मुद्दे२४ हजार १0१ मतदार बजावणार मतदानाचा हक्कमतदान केंद्रांवर ईव्हीएम, मतदान साहित्यासह पथके रवाना पोलीस बंदोबस्त वाढविला!

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. २७ सरपंच पदापैकी तीन सरपंच अविरोध निवडून आले, तर २0५ सदस्यांपैकी ७५ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. तालुक्यात १३0 जागांसाठी ३0८ उमेदवार तर सरपंच पदाच्या २४ जागांसाठी ९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शनिवारी २४ हजार १0१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी पाच ठिकाणी सरळ लढत आहे, तर कोळासा येथे सात सदस्य अविरोध तर दोन जागा रिक्त असताना फक्त सरपंच पदासाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. ग्रा.पं. जोगलखेड सरपंच पदासाठी चार तर सात सदस्य पदासाठी १७ उमेदवार, कारंजा (रमजानपूर) सरपंच पदासाठी दोन तर सात जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात, बहादुरा सरपंच पदासाठी दोन तर सात जागांसाठी तीन अविरोध आणि तीन जागा रिक्त तर एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात, टाकळी खोजबोळ सरपंच पदासाठी तीन तर सात जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात, मनारखेड सरपंच पदासाठी तीन तर नऊ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात, कळंबा बु. सरपंच पदासाठी पाच तर सात जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात, कळंबी (महागाव) सरपंच पदासाठी चार तर नऊ जागांसाठी दोन अविरोध व चार जागा रिक्त तर तीन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात, हिंगणा निंबा सरपंच पदासाठी पाच तर सात जागांसाठी दोन अविरोध व पाच रिक्त, निंबी सरपंच व सहा सदस्य अविरोध आणि एक जागा रिक्त, भरतपूर सरपंच पदासाठी तीन तर नऊ सदस्यांसाठी तीन अविरोध आणि सहा जागांसाठी १२ उमेदवार सरळ लढतीत, कुपटा सरपंच पदासाठी पाच तर सात सदस्यांसाठी दोन अविरोध आणि पाच जागांसाठी ११ उमेदवार, सांगवी (जोमदेव) सरपंच पदासाठी दोन तर सात सदस्यांसाठी दोन अविरोध आणि पाच जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात, तामशी सरपंच पदासाठी चार तर सात जागांसाठी चार अविरोध आणि तीन रिक्त तर केवळ सरपंच पदासाठी मतदान, बारलिंगा सरपंच पदासाठी दोन तर सात जागांसाठी १४ उमेदवार सरळ लढत, दधम सरपंच पदासाठी चार तर सात जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात, शेळद सरपंच पदासाठी पाच तर नऊ जागांसाठी चार अविरोध, पाच जागांसाठी ११ रिंगणात, सातरगाव सरपंच पदासाठी पाच तर सात जागांसाठी चार अविरोध, तीन रिक्त तर केवळ सरपंचासाठी निवडणूक, वझेगाव सरपंच पदासाठी पाच तर सात जागांपैकी दोन अविरोध, पाच जागांसाठी १३ उमेदवार, नागद सरपंच पदासाठी चार तर नऊपैकी चार अविरोध पाच जागांसाठी १0 उमेदवार, मोखा सरपंच पदासाठी तीन तर सात सदस्यांपैकी तीन अविरोध, चार जागांसाठी आठ उमेदवार, हसनापूर सरपंच पदासाठी दोन सरळ लढत, सातपैकी सहा अविरोध एका जागेसाठी दोन उमेदवार, मोरगाव (सादीजन) सरपंच अविरोध तर ऊ सदस्यांसाठी सहा अविरोध तीन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात, मोरझाडी सरपंच पदासाठी चार तर सात सदस्यांपैकी तीन अविरोध चार सदस्यांसाठी नऊ उमेदवार रिंगणात, निमकर्दा सरपंच पदासाठी पाच तर नऊ सदस्यांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७३ केंद्राध्यक्ष व एकूण २२0 कर्मचारी आज मतदान केंद्रावर मतदारांकडून मतदान करून घेतील. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची जबाबदारी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार दीपक पुंडे, निवडणूक नायब तहसीलदार ए.एस. सोनवणे व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.व्ही. दुधे, जे.आर. तिवारी, योगेश कौटकर, अरुण मुंदडा, श्रीधर बोकडे, एम.एस. राऊत, प्रदीप चोरे तर सहा. निवडणूक अधिकारी डी.डी. मानकर, सुभाष ठाकरे, एस.वाय. उमाळे, ए.एस. साखरकर, आर. बी. सावदेकर, सुरेश पवार, प्रकाश हिरुळकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 

पाच गटग्रामपंचायतींसाठी दूरचे मतदान केंद्र - पाच गटग्रामपंचायतींमध्ये शेळद, टाकळी निमकर्दा, जोगलखेड, हसनापूर व कुपटा या गावाला २ ते ३ गावे जोडली आहेत. निवडणूक केंद्र ग्रामपंचायत मुख्यालय (मतदान केंद्राचे अंतर) हे एक कि.मी.च्या आत असावे, असे असताना मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्राची सुविधा देण्यात आली नसल्याचे चित्र आहे. शेळद ग्रामपंचायतीमध्ये अकोला नाका हे अंतर पाच कि.मी. आहे. - टाकळी निमकर्दाला बोराळा, बोरवाकळी, मनाडी या गावाला मतदान केंद्र नाही. या तिन्ही गावांच्या मतदारांना टाकळी निमकर्दा येथे ३.५ कि.मी. अंतरावरून मतदानासाठी जावे लागणार आहे. जोगलखेड, सोनगिरी, अडोशी, धानोरा या तिन्ही गावांच्या मतदारांना तीन कि.मी.पेक्षा जास्त अंतरावरून मतदानासाठी जावे लागणार आहे. - याबाबत मतदार व उमेदवार राजकीय पक्षाने निवडणूक विभागाकडे ना तक्रार केली, ना सुचवले. निवडणूक विभागाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. पर्यायाने मतदारांना उमेदवारांच्या वाहनाचा सहारा घ्यावा लागणार आहे.