शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Blast Case Verdict : प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
3
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
4
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
5
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
7
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
8
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
9
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
10
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
11
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
12
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
13
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
14
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
15
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
16
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
17
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
18
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
19
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
20
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनीला घेतले दत्तक

By admin | Updated: April 12, 2017 21:35 IST

अकोला- म्हैसपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात, हगणदरी मुक्तीवर नाट्य सादर करणाऱ्या चिमुरडीच्या कलेने प्रभावित होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तिला दत्तक घेतले.

शिक्षणाचा खर्चही उचलणार: घरी भेट देऊन जाणून घेतली परिस्थितीअकोला : अकोल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत संवेदनशील असल्याचे प्रत्यंतर म्हैसपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात आले. कार्यक्रमात हगणदरी मुक्तीवर नाट्य सादर करणाऱ्या चिमुरडीच्या कलेने प्रभावित होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तिच्या घरची परिस्थिती समजल्यानंतर तिला दत्तक घेतले. तिच्या शिक्षणाच्या, भविष्यात लग्नाचा खर्चही जिल्हाधिकारी जी.श्रीकांत करणार आहेत. अकोला शहरापासून जवळच असलेल्या म्हैसपूर येथील जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल करण्यात आली आहे. यानिमित्ताने गेल्या आठवड्यात म्हैसपूर येथे ग्रामस्थांच्या मदतीने आयोजित समारंभात जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात जि.प.शाळेत शिकणाऱ्या चवथ्या वर्गातील उन्नती दिलीप इंगळे या चिमुरडीने हगणदरीमुक्तीवर नाटिका सादर केली. सावित्रीबार्इंच्या वेशातील तिचा तो अवतार पाहून जिल्हाधिकारी प्रभावित झाले. कार्यक्रमात त्यांनी सत्कारात मिळालेली शाल आणि पुष्पगुच्छ उन्नतीला देऊन तिचा गौरव केला. एवढ्या छोट्याशा गावात जि.प.शाळेत शिकणारी मुले अशी चुणूक दाखवू शकतात, याचे कौतुक करून जिल्हाधिकाऱ्यांनी उन्नतीची आस्थेने चौकशी केली. तिला जवळ घेत संवाद साधल्यानंतर तिच्या घरीच शौचालय नसल्याचे त्यांना समजले. शौचालय नाही म्हणजेच उन्नतीची घरची परिस्थिती जेमतेम असेल, हे त्यांनी हेरले. त्यानंतर त्यांनी उन्नतीचे घर गाठले व तिच्या कुटुंबियांची चौकशी केली. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या या गरिबांच्या झोपडीला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिल्यामुळे इंगळे कुटुंबियांचा आनंद गगणात मावेना. जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण परिस्थिती पाहून उन्नतीच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च करण्याची तयारी दर्शवून तिला दत्तक घेत असल्याचे जाहीर केले.उन्नतीच्या घरी पोहोचले ‘रेडिमेड टॉयलेट’जिल्हाधिकाऱ्यांनी उन्नतीला दत्तक घेतल्यानंतर तिच्या घरी रेडिमेड शौचालय उभारण्याची जबाबदारी ‘भारत एक कदम’ या संस्थेने स्वीकारली. संचालक अरविंद देठे यांनी गत आठवड्यात कोणतेही शुल्क न घेता उन्नतीच्या घरी रेडिमेड शौचालय उभारून दिले. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच ‘भारत एक कदम’ या संस्थेच्या सामाजिक बांधीलकीचे ग्रामस्थांनी कौतुक केले.