शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

By संतोष येलकर | Updated: September 23, 2023 17:39 IST

अकोला शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाची जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवारी (दि.२२ सप्टेंबर) पाहणी केली.

अकोला: शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाची जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवारी (दि.२२ सप्टेंबर) पाहणी केली. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी अकोला शहरातील जयहिंद चौक, आगर वेस, दगडी पूल, मोहंमद अली चौक, गांधी रोड, सिटी कोतवाली चौक, गणेश घाट, आदी ठिकाणांसह गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्यासह महसूल विभाग आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मिरवणूक मार्गावरील रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून रस्त्यांवरील विजेच्या तारा सुरक्षित उंचीवर नेण्याची कामे करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी कुंभार यांनी संबंधित यंत्रणांना यावेळी दिले. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश  गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी पुरेसा बंदोबस्त व भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी गुरुवारी यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतीसिंह मोहता, महासचिव सिद्धार्थ शर्मा, महानगरपालिका उपायुक्त (प्रशासन) गीता वंजारी, शहर अभियंता नीला वंजारी यांच्यासह विविध गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, महावितरण, तसेच आरोग्य विभागाच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. विसर्जन मार्गावर पुरेसा बंदोबस्त, रस्त्यावर खड्डे असलेल्या भागात दुरुस्तीची कामे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, पेयजल, स्वच्छतागृहे, आदी सुविधांसह वैद्यकीय पथके पुरेशा औषधसाठ्यासह उपलब्ध ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुंभार यांनी दिले.

टॅग्स :Akolaअकोला