शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

निगेटिव्ह रक्तगटाच्या मागणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2017 01:41 IST

जिल्हा एड्स नियंत्रण समितीची बैठक : रक्तदानावर समाधान

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील रक्तदानाच्या आकडेवारीवर समाधान व्यक्त करीत, वाढत्या निगेटिव्ह रक्तगटाच्या मागणीवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त केली.जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या बैठकीला प्रामुख्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार उपस्थित होते. जिल्ह्यातील एचआयव्ही एड््स नियंत्रण कार्यक्रमासह रक्तसुरक्षा संदर्भात कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यामध्ये जिल्ह्यातील रक्तदानाच्या आकडेवारीवर समाधान व्यक्त करीत, वाढत्या निगेटिव्ह रक्तगटाच्या मागणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. गरोदर मातांच्या शस्त्रक्रिया, सिकलसेल, थॅलेसिमिया रुग्णांचे वाढते निदान, यामुळे दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढत आहे. त्यातच अशा रुग्णांचा रक्तगट निगेटिव्ह असल्यास निगेटिव्ह रक्तगट शोधणे कठीण होते. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी जिल्हास्तरावरील ‘एआयसी पोर्टल’मध्ये निगेटिव्ह रक्तदात्यांची यादी समाविष्ट करण्याची सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावेळी केली. जिल्ह्यातील एकाही रुग्णाला रक्ताअभावी राहावे लागणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, गुणवंत प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्ष अरुंधती सिरसाट, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे कार्यक्रम व्यवस्थापक दर्शन जनईकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.वर्षभरात ४३० जण आढळले एचआयव्ही पॉझिटिव्ह!जिल्ह्यात एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षभराच्या कालावधीत ५१ हजार २९८ जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी ४३० जण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यापैकी ४२२ रुग्णांवर मोफत उपचार सुरू असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. तसेच गत ते जून २०१७ या कालावधीत ९९ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून, सन २०१६-१७ या वर्षात २१ गर्भवती मातांना आणि गत एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत ५ गर्भवती मातांना एचआयव्ही एड्सची लागण झाल्याचे आढळून आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.वीटभट्ट्यांवरील कामगारांची तपासणी करणार!वीटभट्ट्यांवरील कामगारांनी टीबी, लेप्रसी, एचआयव्ही यासंबंधी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील वीटभट्ट्यांवरील कामगारांची तपासणी करण्यासंदर्भात तहसीलदारांना सूचना देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले.