शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाचे निर्देश धाब्यावर; अन्नधान्याचे दर वाढविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:32 IST

अवघ्या दोनच दिवसांत किराणा व्यावसायिकांनी अन्नधान्याचे दर वाढविले आहेत.

अकोला: देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी पुढील २१ दिवसांकरिता ‘लॉकडाऊन’ची घोषणा करताच शहरातील काही किराणा व्यावसायिकांकडून नफेखोरीला प्राधान्य दिले जात असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश धाब्यावर बसवित अवघ्या दोनच दिवसांत किराणा व्यावसायिकांनी अन्नधान्याचे दर वाढविले आहेत. संबंधित व्यावसायिकांवर कारवाईचा आदेश दिलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांना विचारणा केली असता पथक गठित केल्यानंतर गुरुवारी सायंकाळपासून कारवाईला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जीवघेण्या कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ मार्च रोजी कलम १४४ अन्वये जमावबंदी व २३ मार्च रोजी थेट संचारबंदी लागू केली. अशा संकटाचा सर्वांनी मुकाबला करण्याची गरज असताना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याची विक्री करणाºया व्यापाऱ्यांनी व किराणा व्यावसायिकांनी साठेबाजी करीत अवघ्या दोनच दिवसांत अन्नधान्याचे दर वाढविल्याचे चित्र समोर आले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, ही बाब गंभीरतेने घेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अन्नधान्याचे दर वाढविण्यासोबतच साठेबाजी करणाºया व्यावसायिकांचे गोदाम, प्रतिष्ठाने, दुकानांची आकस्मिक तपासणी करण्याचे निर्देश २५ मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांना दिले होते. यादरम्यान, साठेबाजी करणे व भाववाढ करण्याच्या मुद्यावर गुरुवारी जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या दालनात होलसेल किराणा मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाºयांची बैठक घेतली. शहरालाच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याला पुरवठा होईल, इतका अन्नधान्याचा साठा उपलब्ध असताना भाववाढ करण्याची गरज नसल्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यावर काही विशिष्ट व्यापारी व किराणा व्यावसायिकांनी भाववाढ केल्याची बाब समोर आली.‘डीएसओं’च्या कारवाईकडे लक्षशहरात अन्नधान्याचे दर वाढविल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी पापळकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांना संबंधित व्यावसायिकांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी ‘डीएसओ’ काळे नेमक्या कोणत्या व्यावसायिकांवर कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.चढ्या दराने विक्री सुरूच!शहराच्या विविध भागातील किराणा व्यावसायिक दुकानात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा उपलब्ध नसल्याचे सांगत चढ्या दराने विक्री करीत आहेत. वाढीव दराने विक्री करीत असल्याने ग्राहकांना देयकसुद्धा दिले जात नसल्याचे समोर आले आहे. संबंधितांच्या तक्रारी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला