शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हय़ातील दोन लाखांवर बालकांना देणार जंतनाशक गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 19:53 IST

अकोला : बालकांमधील कृमीदोष हा रक्तक्षय व कुपोषणाचे मुख्य कारण असल्यामुळे त्यांच्या आतड्यांमध्ये वाढणार्‍या परोपजीवींचा समूळ नाश करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत १८ ऑगस्ट रोजी जिल्हय़ातील (शहर व ग्रामीण) १ ते १९ या वयोगटातील बालक व किशोरवयीन मुलांना जंतनाशक गोळय़ांचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्हय़ातील तब्बल  २ लाख ९१ हजार ८६१ बालकांना आरोग्य विभागामार्फत अँल्बेन्डॉझॉलची गोळी देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१८ ऑगस्टला मोहीम शाळा, अंगणवाडी केंद्रांमध्ये होणार वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बालकांमधील कृमीदोष हा रक्तक्षय व कुपोषणाचे मुख्य कारण असल्यामुळे त्यांच्या आतड्यांमध्ये वाढणार्‍या परोपजीवींचा समूळ नाश करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत १८ ऑगस्ट रोजी जिल्हय़ातील (शहर व ग्रामीण) १ ते १९ या वयोगटातील बालक व किशोरवयीन मुलांना जंतनाशक गोळय़ांचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्हय़ातील तब्बल  २ लाख ९१ हजार ८६१ बालकांना आरोग्य विभागामार्फत अँल्बेन्डॉझॉलची गोळी देण्यात येणार आहे.महाराष्ट्रात कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या पाच वर्षाखालील बालकांची टक्केवारी ३४.४ टक्के आहे. तसेच १५ ते १९ वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३0 टक्के मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. यामागचे मुख्य कारण आतड्यांमध्ये वाढणारे परोपजीवी आहेत. यासाठी राज्यात १८ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हय़ात शहर व ग्रामीण भागातील २ लाख ९१ हजार ८६१ बालकांना आरोग्य विभागामार्फत अँल्बेन्डॉझॉलची गोळी देण्यात येणार आहे. सर्व आरोग्य संस्थांच्या कर्मचार्‍यांमार्फत सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांमध्ये गोळय़ांचे वितरण होणार आहे.

२३ ऑगस्टला मॉप-अप राउंडराष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत १८ ऑगस्ट रोजी कोणताही लाभार्थी  गोळी घ्यावयाचा राहिल्यास त्याला २३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार्‍या मॉप-अप राउंडमध्ये गोळी देण्यात येणार आहे. सदर मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखाँ पठाण, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. नितीन अंबाडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी केले आहे.