शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

१00 ट्रॅक्टरद्वारे महाप्रसादाचे वितरण

By admin | Updated: January 20, 2017 02:20 IST

हिवरा आश्रम येथे विवेकानंद जन्मोत्सवाची महाप्रसादाने सांगता.

ओमप्रकाश देवकरहिवरा आश्रम (बुलडाणा), दि. १९- सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची गुरुवार, १९ जानेवारी रोजी महाप्रसाद वितरणाने सांगता झाली. यावेळी एकाच पंगतीत बसलेल्या लाखो भाविकांना १00 ट्रॅक्टरच्या मदतीने १५१ क्विंटल गव्हाचा पिठाच्या पुर्‍या आणि १0१ क्विंटल वांग्याची भाजीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. हिवरा आश्रम येथे दरवर्षी स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. लाखो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करून महोत्सवाची सांगता करण्यात येते. यावेळी शुकदास महाराज, खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर, बबनराव भोसले, माधवराव जाधव, बबनराव तुपे, ऋषी जाधव, अँड. शैलेश देशमुख, आशाताई झोरे, मंदाकिनी कंकाळ, आशिष रहाटे, सीताराम ठोकळ, महंमद अली, अँड.किशोर धोंडगे, सिद्धेश्‍वर पवार, भरत सारडा, मनीष मांडवगडे, प्रा. मधू आढाव, समाधान म्हस्के, संतोष थोरहाते आदी उपस्थित होते. गुरुवारी दुपारी ४ वाजता स्वामी विवेकानंदांच्या जयघोषात आणि वाजतगाजत वाहनांद्वारे महाप्रसाद आणण्यात आला. त्यानंतर फटाक्याच्या आतषबाजीने महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात आली. तब्बल शंभर ट्रॅक्टरद्वारे व हजारो स्वयंसेवकांच्या सहाय्याने शिस्तबद्ध पद्धतीने पुरी-भाजीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महाप्रसादासाठी १५१ क्विंटल गव्हाचा पिठाच्या पुर्‍या आणि १0१ क्विंटल वांग्याची भाजी बनविण्यात आली होती. महाप्रसाद बनविण्यासाठी परिसरातील अनेक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाचे संचालन हभप गजानन शास्त्री पवार यांनी केले. यावेळी विवेकानंद आश्रमाचे सर्व विश्‍वस्त, सर्व शैक्षणिक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.