आगर: रविवार, १ जून रोजी येथे लागलेल्या आगीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनातर्फे आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. तलाठी दीपक पाटणकर, एन. आर. माहोरे यांनी सरपंच सतीश काळणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकसानग्रस्तांना प्रतिकुटुंब २,७०० रुपयेप्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली. गजानन आनंदा पातोंड, अंबादास साबे, शंकर नवलकार, तुळशीराम चिकटे, पुरुषोत्तम पातोंड यांना ही मदत देण्यात आली. यावेळी जि.प. अध्यक्ष शरद गवई, उपाध्यक्ष देशमुख, जि. प. सदस्य साबळे यांच्यासह भारिप-बमसंचे दिनकर वाघ यांची उपस्थिती होती. उर्वरित आगग्रस्त कुटुंबांना शासनातर्फे मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे यावेळी लोकप्रतिनिधींनी सांगितले. आगर येथे लागलेल्या आगीत एकूण १३ ते १६ घरांचे नुकसान झाले असून, शासनातर्फे केवळ पाच कु टुंबांना मदत देण्यात आली. उर्वरित आगग्रस्त कु टुंब शासनाकडून मिळणार्या मदतीची प्रतीक्षा करीत आहेत.
आगग्रस्तांना आर्थिक मदतीचे वितरण
By admin | Updated: June 3, 2014 20:52 IST