शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीचे वाटप तालुका स्तरावर!

By admin | Updated: January 13, 2015 01:29 IST

७५ कोटींचे वितरण ;दोन दिवसांत वाटप सुरू होणार.

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून प्राप्त झालेला ७५ कोटी ७ लाखांचा मदतनिधी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर वितरित करण्यात आला. तालुका स्तरावरून दोन दिवसांत मदतीचे वाटप सुरू करण्यात येणार असून, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात खरीप हंगामातील सर्वच पिके हातून गेली. दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये ४ लाख ३0 हजार ४ हेक्टर ९५ आर क्षेत्रावरील पिकांचे उत्पादन बुडाले. या पीक नुकसानभरपाईपोटी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटपाकरिता १४४ कोटी ५१ लाख ९५ हजार ४८२ रुपयांच्या मदतनिधीची आवश्यकता आहे. त्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आवश्यक निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली. दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी मदतनिधी वितरणाच्या पहिल्या टप्प्यात, शासनाकडून ७५ कोटी ७ लाखांचा मदतनिधी ९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध झालेला मदतनिधी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवार, १२ जानेवारीला जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर तहसीलदारांना अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला. उपलब्ध मदत निधीतून तहसील कार्यालयांमार्फत दोन दिवसांत (बुधवारपासून) दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटपाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकर्‍यांच्या बँकनिहाय याद्या बँकेत सादर करून मदतीची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी आवश्यक असलेल्या निधीच्या तुलनेत प्राप्त झालेला मदतनिधी कमी असल्याने, इंग्रजी वर्णाक्षरानुसार गावांची निवड करून, संबंधित गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटपाची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी जिल्हय़ातील तहसीलदारांना दिले आहेत.