शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

छेडखानीवरून वाद, दोन गट आमोरासमोर

By admin | Updated: July 10, 2015 01:24 IST

गांधी चौकात काही काळ तणावाचे वातावरण.

अकोला: युवतीच्या छेडखानीवरून वाद उपस्थित झाल्याने दोन गट आमोरासमोर उभे ठाकल्याने गांधी चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना गुरुवारी रात्री १0.१५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरातील एक युवती तिच्या भावासोबत खरेदी करण्यासाठी गांधी रोडवर आली. यावेळी गवळीपुर्‍यातील सिमरान गौरवे नामक युवकाने युवतीची छेड काढली. युवतीच्या भावाने युवकाला जाब विचारला. दोघांमध्ये वाद झाला. वादामध्ये गौरवे याने कत्ता आणून युवतीच्या भावावर हल्ल्याचा प्रयत्न केला आणि जमाव गोळा केला. ही माहिती दुसर्‍या गटातील युवकांना कळल्यावर तेही गांधी चौकात गोळा झाले. दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याने दंगल उसळते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे दुकानदारांनीही त्यांची दुकाने बंद केली; परंतु कोतवाली पोलिसांचा ताफा घटनास्थळावर वेळीच हजर झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी छेडखानी करणार्‍या युवकाला ताब्यात घेतले. घटनेची माहिती शहरात वार्‍यासारखी पसरली. दोन्ही गटातील १00 ते १५0 लोक पोलीस ठाण्यावर गोळा झाले. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस ठाण्यामध्ये गोळा होत असलेला जमाव पाहून आरसीपी जवानांना पाचारण करण्यात आले. तसेच गांधी रोड परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.