शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी समित्या बरखास्त करा! -  आमदार रणधीर सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 13:55 IST

अकोला: विद्यार्थी व नागरिकांसाठी त्रासदायक व डोकेदुखी ठरत असल्याने, राज्यातील जात पडताळणी समित्या बरखास्त करण्यात याव्या, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे शनिवारी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विद्यार्थी व नागरिकांसाठी त्रासदायक व डोकेदुखी ठरत असल्याने, राज्यातील जात पडताळणी समित्या बरखास्त करण्यात याव्या, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे शनिवारी केली.राज्यातील मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी जात पडताळणी समित्या गठित करण्यात आल्या होत्या; परंतु या समित्या विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळण्याऐवजी त्रासदायक व डोकेदुखी ठरत आहे. तसेच नागरिकांना आर्थिक भुर्दंड व मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.देशातील इतर राज्यात जात पडताळणी समित्या अस्तित्वात नसताना राज्यातही या समित्या नसाव्या, अशी मागणी आ. सावरकर यांनी केली आहे. गेल्या पाच वर्षात विद्यार्थी व मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी आपण अनेकदा जात पडताळणी कार्यालय गाठले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला; परंतु जात पडताळणी कार्यालयाच्या कामकाजामध्ये सुधारणा होत नाही.कार्यालयात कायमस्वरूपी कर्मचारी, अधिकारी व समिती अध्यक्ष नसणे अशी अनेक कारणे सांगून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार अकोला जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र असल्याचे चित्र असून, नागरिकांना न्याय मिळण्याऐवजी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जात पडताळणीची कामे पूर्वीप्रमाणे महसूल विभागांतर्गत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे (महसूल) सोपविण्यात यावी, अशी मागणीही आ. रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांकडे केली आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाRandhir Savarkarरणधीर सावरकर