शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

कर्जमाफीच्या गोंधळाने शेतकर्‍यांमध्ये असंतोष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:36 IST

अकोला : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर वारंवार निकष आणि निर्णय बदलण्याच्या गोंधळाने विदर्भासह राज्यातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असा आरोप शेतकरी नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी बुधवारी सायंकाळी येथे केला. 

ठळक मुद्देशंकरअण्णा धोंडगे यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर वारंवार निकष आणि निर्णय बदलण्याच्या गोंधळाने विदर्भासह राज्यातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असा आरोप शेतकरी नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी बुधवारी सायंकाळी येथे केला. शेतकरी-शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडून शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली; परंतु कर्जमाफीच्या घोषणेनंतर यासंदर्भात वारंवार निकष व निर्णय बदलण्यात येत असल्याच्या गोंधळामुळे २0 टक्के शेतकर्‍यांनाही या कर्जमाफीचा लाभ होण्याची चिन्हे नसल्याने, विदर्भासह राज्यभरात शेतकर्‍यांमध्ये असंतोषाची भावना पसरली असल्याचा आरोप धोंडगे यांनी केला. गत तीन वर्षांपासून राज्यातील शेतकरी व शेतमजूर दुष्काळ, नापिकी तसेच शेतमालाचे कमी झालेले भाव , नोटाबंदी व इतर कारणांमुळे शेतकरी-शेतमजूर त्रस्त झाला आहे, असे सांगत आयात-निर्यातीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांसह ग्रामीण जनतेचे अर्थकारण मोडीत निघाले असून, शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री, अर्थमंत्री विदर्भातील असूनही विदर्भातील शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेले सोयाबीन व भात पिकाचे अनुदान दोन वर्षांपासून शेतकर्‍यांना मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतीच्या विविध प्रश्नांवर शेतकरी समाजाने संघटित लढा उभारण्याची गरज आहे. त्यानुषंगाने शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी किसान मंचच्यावतीने १ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर या कालावधीत शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे, असेही धोंडगे यांनी यावेळी सांगितले. यावेळी शेतकरी जागर मंचचे प्रशंत गावंडे, मनोज तायडे, जगदीश मुरुमकार, सम्राट डोंगरदिवे, सैयद वासीफ , विजय देशमुख, शेख अन्सार, ज्ञानेश्‍वर सुलताने, प्रशांत नागे, मयूर वहिले, राहुल घाटे उपस्थित होते.

कर्जमाफी उपकार नाही! राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी हा काही उपकार नाही, तर घटनेतील तरतूद आहे, असे सांगत कर्जमाफीसाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, असेही शंकरअण्णा धोंडगे यांनी यावेळी सांगितले.

आजपासून जिल्ह्यात संवाद यात्रा!गत १ ऑगस्टपासून सेवाग्राम येथून सुरू करण्यात आलेल्या शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत संवादयात्रा  २४ ते २६ ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यातून जाणार आहे. त्यामध्ये किसान मंच व शेतकरी जगार मंचच्यावतीने कर्जमाफी व शेतमालाला रास्त भाव, यासह शेतकर्‍यांच्या इतर मागण्यांसंदर्भात शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.